इस साल धंदा बहुत यानी बहुत मंदा 

शेखलाल शेख
गुरुवार, 21 मे 2020

रमजान महिन्यात अनेक पटीने पेंडखजुर, ड्रायफ्रुटची विक्री होते. मात्र सगळ्यांचा माल दुकानात पडुन आहे. तो विक्री कसे करणार हा त्यांच्या समोर प्रश्‍न आहे. 
 

औरंगाबादः रमजान महिन्यात ड्रायफ्रुटची दहापटीने अधिक विक्री असते. मात्र कोरोनात लॉकडाऊनमुळे हा आमचा सर्व व्यवसाय बुडाला. पेंडखजुरचे शंभर बॉक्स पडुन आहे. विक्री करणार कसे वर्षातील ड्रायफ्रुट आणि मशाल्याचे सिझन हातातून गेले. बाहेर पोलिस असल्याने होम डिलीव्हरी करणार कशी. इस साल धंदा बहुत यानी बहुत मंदा हो गया हे वाक्य आहे ड्रायफ्रुट आणि मसाला विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे. 

ईद उल फित्र म्हटलं की शिरखुर्मा आला. गरीब असो की श्रीमंत प्रत्येकाच्या घरात शिरखुर्मा हमखास असतोच. शिरखुर्मासाठी रमजानच्या शेवटच्या दहा पंधरा दिवसात खरेदी केली जाते. मात्र वर्षी लॉकडाऊमुळे संपुर्ण रमजान महिना आणि ईद उल फित्र ही घरातच राहणार आहे. त्यातच काहीच कामधंदा नसल्याने लोकांची खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नाही. त्यामुळे याचा मोठा फटका ड्रायफ्रुट आणि मसाले विक्री करणाऱ्यांना बसला आहे. 

वर्षातील महत्वाचे चार सिझन हातातून गेले 

ड्रायफ्रुट आणि मसाले विक्रेत्यांना महत्वाचे चार सिझन मिळतात. यामध्ये लग्न सराई, विविध उत्सव, मांगवीरबाबा सारख्या मोठ्या यात्रा तसेच रमजान असे महत्वाचे त्यांचे चार सिझन असतात. मात्र हे सर्व काही लॉकडाऊमध्ये गेले आहे. रमजान महिन्यात अनेक पटीने पेंडखजुर, ड्रायफ्रुटची विक्री होते. मात्र सगळ्यांचा माल दुकानात पडुन आहे. तो विक्री कसे करणार हा त्यांच्या समोर प्रश्‍न आहे.

हेही वाचा- गुरुवारपासून पाच तास सुरु राहणार बँका

होम डिलीव्हरीला मर्यादा 

सध्या कोरोनामुळे अनेक जण शिरखुर्मा जास्तीत जास्त फक्त घराच्या घरी तयार करतील. मात्र अनेकांना शिरखुर्माची साहित्य खरेदी करणे शक्य नाही. काही जणांनाकडे पैसेच नाही. अशा स्थितीत ही होम लिडीव्हरीसाठी व्यावसायिकांनी पुढाकार घेतला मात्र त्याला ही फारसा प्रतिसाद नाही. काही ठिकाणी दिले तरी बाहेर पोलिस असल्याने होम डिलीव्हरी करता येत नाही. त्यामुळे या वर्षीचा ड्रायफ्रुटचा पुर्ण व्यवसाय गेला आहे. 

ड्रायफ्रुटच्या दरात वाढ नाही 

कोरोनामुळे दुकानादारांचे ड्रायफ्रुट विक्री झाले नाही. काही जणांनी पेंडखजुर मागविले होते मात्र ते सुद्धा पुर्णपणे विक्री झालेले नाही. अशा स्थितीत शिरखुर्मासाठी लागणाऱ्या ड्रायफ्रुटच्या दरात वाढ झालेली नाही. सध्या बदाम ८०० ते १०००, काजू ८०० ते १२००, पिस्ता १६०० ते २०००, खोबरा १५० ते १८०, मनुके ३० ते ५०० रुपये किलो असा दर आहे. तर शेवयांचा १०० ते २०० रुपये असा दर आहे. 

माझ्याकडे सध्या शंभर पेंडखजुरचे बॉक्स पडून आहे. रमजाननंतर ते विक्री करणे शक्य नाही. तसेच मसाला आणि ड्रायफ्रुटसाठी असणारे लग्नसराई, रमजान हे सिझन हातातून गेले आहे. रमजानच्या अगोदर माल मागविला होता मात्र आता विक्री करतांना अनेक अडचणी आहे. 
मोहम्मद तारेक (ड्रायफ्रुट, मसाला विक्रेते) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dry Fruit Shop Keeper Aurangabad News