मराठवाड्यात 8 हजार 360 कोटींची येणार गुंतवणूक : सुभाष देसाई

मराठवाड्यात 8 हजार 360 कोटींची येणार गुंतवणूक : सुभाष देसाई

औरंगाबाद : आगामी काळात मराठवाड्यातील ऑरिक सिटीसह अन्य ठिकाणी 16 नवीन उद्योग येणार आहेत. या माध्यमातून मराठवाड्यात आठ हजार 360 कोटींची गुंतवणुक येणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. 


औरंगाबादेत मसिआतर्फे महाराष्ट्र ऍडव्हॉन्टेज एक्‍स्पोच्या उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. श्री. देसाई म्हणाले, की एमआयडीसीच्या माध्यमातून मराठवाड्यात उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात चार औद्योगिक वसाहती तयार करण्यात येत आहे. त्यांचे कामही सुरु झाले आहे. त्यात उस्मानाबादमध्ये वडगाव सिद्धेश्‍वर, औरंगाबादेत अतिरिक्‍त शेंद्रा, लातूर  या गावाच्या आसपास एकूण एक हजार 18 हेक्‍टरमध्येही औद्योगिक वसाहती तयार करत आहोत. त्याच बरोबर नांदेड जिल्ह्यात कृष्नूर औद्योगिक वसाहत होणार आहे. 

ड्रायपोर्टही अंतिम टप्प्यात 

ऑरिकजवळ जालना येथे जेएनपीटी ड्रायरपोर्ट लवकरात-लवकर व्हावे यासाठी काम सुरु आहे. यासह मराठवाडा हा कापूस उत्पादक विभाग असल्यामुळे कापसावर आधारित उस्मानाबाद जिल्ह्यात टेक्‍निकल टेक्‍सस्टाईल हब तयार करण्यात येणार असल्याचेही यावेळी श्री. देसाई यांनी सांगितले. 

ही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली... 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही महाराष्ट्राची इच्छा 
महाराष्ट्राला ज्यांनी मुख्यमंत्री व्हावे असे वाटत होते. ते उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. ही इच्छा पूर्ण झाली. आता महाराष्ट्राच्या अनेक इच्छा पूर्ण करण्याचा विडा उद्धव ठाकरे यांनी उचलला आहे. आता राज्यातील शेती क्षेत्रातील, पाणी, उद्योग क्षेत्रासह सर्व समस्यांना इच्छा भक्‍कमपणे तोंड देत सोडवत महाराष्टाला पुढे न्यायचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. याला आपण पाठिंबा देणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

 
देशभरातील 450 स्टॉलधारकांचा सहभाग 

कलाग्राम' परिसरातील 32 एकरांत एक्‍स्पो होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या महाएक्‍स्पोत 450 स्टॉलधारकांनी सहभाग नोंदविला आहे. महाएक्‍स्पोमध्ये लहान, मध्यम तसेच मोठ्या उद्योगांनी आपला सहभाग नोंदविला आहे. जगभर निर्यात होणारी शेकडो प्रकारची उत्पादने, तंत्रज्ञानात झालेली प्रगती, अनोखे प्रयोग आणि अभिमान वाटावी अशी मराठवाड्यातील उद्योजकांची गरुडभरारी यातून प्रदर्शित होणार आहे. एक्‍स्पोत प्रदर्शनाशिवाय विविध विषयांवर चर्चासत्र होतील. भविष्यातील संधी, ऍग्रोप्रोसेसिंग, युवा संवादातून युवा राजकीय नेते, मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार धीरज देशमुख यांचे मराठवाड्याविषयीचे व्हिजन तरुण उद्योजक होऊ पाहणाऱ्यांना कळणार आहे. 

अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com