
कोरोना संसर्गामुळे शिवजयंती उत्सव साजरा करताना नागरिकांसाठी नियमावली ठरवून देण्यात आली आहे
औरंगाबाद: कोरोना संसर्गामुळे शिवजयंती उत्सव साजरा करताना नागरिकांसाठी नियमावली ठरवून देण्यात आली आहे. त्यात बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असे, नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता. 13) सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी महापालिकेत विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शिवजयंती उत्सवावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे शिवप्रेमींंमधून संताप व्यक्त केला जात असून हे निर्बंध मागे घेण्यात यावे, अशी मागणी सुरू आहे. या संदर्भात राज्यशासन विचार करणार आहे का ? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, कोरोना संसर्गामुळे शिवजयंती उत्सवासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यात बदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेऊ शकतात असे त्यांनी स्पष्ट केले.
'ही घटना दुर्दैवी', टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी...
'पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चौकशीअंती सत्य समोर येईल'
परळी येथील पूजा चव्हाण हिने काही दिवसांपूर्वी पुण्यात आत्महत्या केली असून, तिच्या आत्महत्येला शिवसेनेचा मंत्री जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्यावर श्री. शिंदे म्हणाले, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील व दुर्दैवी आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणाचे नाव जोडणे व अधिक बोलणे योग्य होणार नाही.
"दिल्ली, नोएडा पाठोपाठ आता औरंगाबाद शहरात चार्जिंग सेंटर'
सोमवारी निघतील आकृतिबंधाच्या मंजुरीचे आदेश-
महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत आजी-माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी महापालिकेचा नोकर भरती संदर्भातील आकृतीबंध मंजूर करावा अशी गळ एकनाथ शिंदे यांना घातली. त्यावर सोमवारी या संदर्भात आदेश निघतील अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली. महापालिकेने आपल्या उत्पन्नात वाढ करून शासनाच्या विविध योजनेतील हिस्सा टाकावा, अशा सूचनाही श्री. शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना यावेळी केल्या.
(edited by- pramod sarawale)