पुणे मार्गावर धावणार इलेक्‍ट्रिक बस 

अनिल जमधडे
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

एसटी महामंडळाचे दोनशे बस खरेदीचे नियोजन 

औरंगाबाद : पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या इलेक्‍ट्रिक बस लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. इलेक्‍ट्रिक बस औरंगाबाद-पुणे मार्गावर चालवण्यात येणार आहेत. साधारण मे महिन्यांनतर पुणे आणि औरंगाबाद येथे इलेक्‍ट्रिक बस चार्जिंग स्टेशनची उभारणी झाल्यानंतर ही बससेवा सुरू होणार आहे. 

पर्यावरणाच्या दृष्टीने केंद्र शासनाने धोरणात्मक बदल सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून बॅटरीवरील वाहनांना प्राधान्य देण्यात येत आहे. एसटी महामंडळाने तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाच्या ताफ्यात दोनशे बस आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या बसची खरेदी करण्यात येणार आहे.

त्याने आधी बांधून घेतली होती राखी.... 

पहिल्या टप्प्यात औरंगाबाद आणि पुणे आगाराला प्रत्येकी 25 बस दिल्या जाणार आहेत. औरंगाबाद आगारातर्फे पुणे मार्गावर या बस चालवण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. 

इलेक्‍ट्रिक बस प्रवासी सेवेत आणल्यानंतर त्यांच्या चार्जिंगचा प्रश्न महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळेच औरंगाबाद आणि पुणे येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. सध्या विभाग नियंत्रक कार्यालयाच्या लगत असलेल्या जागेवर हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. याबाबत लवकरच निर्णय होऊन चार्जिंग स्टेशनचे काम सुरू करण्यात येणार आहे.

येळकोट : लैंगिकतेची "बोल्ड' चर्चा  

एसटी महामंडळाकडून प्रस्तावित असलेल्या दोनशे इलेक्‍ट्रिक बसची खरेदी साधारण मे महिन्यापर्यंत होण्याची शक्‍यता आहे. त्यानुसारच बसची खरेदी करण्यात येणार आहे. बस खरेदी झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात औरंगाबाद-पुणे या अधिक ट्रॅफिक असलेल्या मार्गावर ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शहरवासीयांना पुण्यासाठी आणखी दर्जेदार सेवा मिळणार आहे.  

गंभीरच : धोकादायक शिवशाही  

 

एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच प्रदुषणमुक्त इलेक्‍ट्रिक बस येत आहेत. या बस पुणे मार्गावर चालवण्याचा विचार आहे. 
अरुण सिया (विभाग नियंत्रक, एसटी औरंगाबाद विभाग) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electric bus that runs on the Aurangabad Pune route