कौटुंबिक हिंसाचाराचा वाढता आलेख चिंताजनक

अनिल जमधडे
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

मराठवाड्यात 38 टक्के महिलांना घरातच त्रास औरंगाबाद 

औरंगाबाद : मराठवाड्यात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 38 टक्के महिला कौटुंबिक हिसाचाराला बळी पडल्या. त्यात वर्षभरात 26 टक्के महिलांना हिंसाचाराला बळी पडावे लागल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. 

कौटुंबिक हिंसाचार

मराठवाड्यात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचा चिंताजनक अहवाल रविवारी (ता. नऊ) प्रसिद्ध करण्यात आला. स्विसएड, हॅलो मेडिकल फाउंडेशन आणि मानवलोक संस्थेतर्फे हा धक्कादायक अहवाल एमजीएम महाविद्यालयाच्या आर्यभट्ट सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध करण्यात आला. अध्यक्षस्थानी एमजीएमचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे होते. महिला बालविकास विभागाचे उपायुक्त एम. के. सिरसाट, एमजीएमचे सचिव अंकुश कदम आणि डॉ. स्मिता अवचार प्रमुख पाहुण्या होत्या.

म्हणून तिने केले केशदान  

कौटुंबिक हिंसाचार व पुढील कामाची दिशा

स्विसएड संस्थेच्या राष्ट्रीय समन्वयक कविता गांधी यांनी कौटुंबिक हिंसाचाराविषयी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संदर्भ व स्विसएडची भूमिका यावर मांडणी केली. डॉ. क्रांती रायमाने आणि गोपाल कुलकर्णी यांनी पॉवर पाइंट प्रेझेंटेशनद्वारे अहवालातून स्पष्ट झालेली विदारकता लक्षात आणून दिली. दिवभरात हॅलोचे अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी यांनी "कौटुंबिक हिंसाचार व पुढील कामाची दिशा' यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केला. स्विसएडच्या स्नेहा गिरधारी यांनी सूत्रसंचालन केले. मानवलोकच्या डॉ. अरुंधती पाटील यांनी आभार मानले. खुली चर्चा सत्राच्या डॉ. स्मिता अवचार अध्यक्षस्थानी होत्या. 

रेल्वेचा मराठवाड्याला  पुन्हा "बाय बाय' 

यावेळी मानवलोकच्या डॉ. अरुंधती पाटील, ग्रामीण महिला विकास संस्थेचे कुशावर्ता बेळे, उगम संस्थेचे जयाजी पाईकराव, डॉ. शुभांगी अहंकारी, सजग संघर्ष समितीच्या मंगल खिंवसरा, डॉ. रश्‍मी बोरीकर यांच्यासह महिला बालविकास आयुक्तालयाचे कर्मचारी, संरक्षण अधिकारी, टाटा सामाजिक विज्ञान संस्थान मुंबईअंतर्गत व्हीएडब्ल्यू सेल, अभ्यासक उपस्थित होते. 

चटका लावणारी "मॅट्रिक' ची कहाणी 

असा केला अभ्यास 

संस्थेतर्फे मराठवाड्यातील हिंगोली, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या चार जिल्ह्यांमध्ये पन्नास गावांची निवड करून थेट 13 ते 49 वयोगटातील विवाहित महिलांशी भेटून सर्वेक्षणात्मक अभ्यास केला.

बलात्काऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप  

प्रश्‍नावली भरून घेण्यात

महिलांकडून दहा विभागांतील विविध माहिती सांगणारी प्रश्‍नावली भरून घेण्यात आली. यामध्ये 38 टक्के महिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडल्या आहेत. वर्षभरात 26.7 टक्‍के महिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात 19 वर्षांच्या आत विवाह होणाऱ्या महिलांचे प्रमाण तीन टक्के असल्याचे स्पष्ट झाले. शारीरिक हिंसा प्रकारात 33 टक्के आणि गेल्या वर्षभरात 22 टक्के महिला बळी पडल्या. भावनिक हिंसाचाराला 24 टक्के आणि वर्षभरात 17 टक्के महिला बळी पडल्या. 12 टक्के महिला सेक्‍स्युअल हिंसेला बळी पडल्या. हे वर्षभरातील प्रमाण नऊ टक्के आहे. घरगुती हिंसाचार कायदा (पीडब्लूडीव्ही ऍक्‍ट 2005) महिलांना माहीत नाही. केवळ नऊ महिलांनी या कायद्याची काहीशी माहिती असल्याचे सांगितले. 

बीडमध्ये नाही महिलांना साहाय्य करणारी यंत्रणा 
माजी महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात तर महिलांना साहाय्य करणारी यंत्रणा दिसली नाही. कौटुंबिक हिंसाचारविरोधी 2005 कायदा महिलांपर्यंत पोचलाच नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. धक्का

गंभीरच : धोकादायक शिवशाही  

धक्कादायक खुलासा 

-50 टक्के विवाह बालविवाह 
-तीनपैकी एका महिलेवर कौटुंबिक हिंसाचार 
-77 टक्के महिलांना कुठलीच मदत मिळाली नाही 
-10 टक्‍के महिलांना कौटुंबिक हिंसाचार कायदा माहीत नाही 
-केवळ दीडटक्का महिलांनी कायद्याचा वापर केला 
-केवळ तीन टक्के महिला कोर्टापर्यंत पोचल्या 
---  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family violence News in Aurangabad