esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

अवेळी पावसाने नुकसान शेतकऱ्यांना मिळाली इतकी रक्कम

ऑक्‍टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात अवेळी पावसाने खरिपासह, भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान केले होते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील 40 लाख 47 हजार 54 हेक्‍टरवरील कोरडवाहू, 69 हजार 411 हेक्‍टरवरील बागायती तर 32 हजार 552 हेक्‍टरवरील फळबागांचे नुकसान या पावसाने केले होते. शासनाकडे मराठवाडा विभागाकडून आधी 2904 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

अवेळी पावसाने नुकसान शेतकऱ्यांना मिळाली इतकी रक्कम

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यभरात ऑक्‍टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून मंजूर केलेल्या निधीत शासनाने मराठवाड्याच्या वाट्याला 489 कोटी 95 लाख 17 हजार रुपये दिले आहेत. त्यामुळे अवेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्‍टरच्या मर्यादेत नुकसानभरपाई म्हणून शासनाने आजवर 3100 कोटी 61 लाख 35 हजार रुपये दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पावसामुळे झाले होते प्रचंड नुकसान 

ऑक्‍टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात अवेळी पावसाने खरिपासह, भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान केले होते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील 40 लाख 47 हजार 54 हेक्‍टरवरील कोरडवाहू, 69 हजार 411 हेक्‍टरवरील बागायती तर 32 हजार 552 हेक्‍टरवरील फळबागांचे नुकसान या पावसाने केले होते. शासनाकडे मराठवाडा विभागाकडून आधी 2904 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

हेही वाचा : त्याने आधी बांधून घेतली होती राखी....

त्यानंतर या मागणीत थोडी वाढ करून 3350 कोटींची मागणी शासनदरबारी रेटण्यात आली होती. या अनुषंगाने शासनाकडून आधी 2610 कोटी 66 लाख 18 हजारांचा निधी पाठविण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा नव्याने शासनाकडून एक फेब्रुवारी 2020 च्या शासन निर्णयानुसार 489 कोटी 95 लाख 17 हजार रुपयांचा निधी वितरित करण्याला मंजुरी देण्यात आली. 

राज्यातही मिळाला निधी 

अवेळी पावसामुळे नुकसानीपोटी राज्यातील विविध विभागांना आतापर्यंत 7309 कोटी 36 लाख 65 हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये एक फेब्रुवारी 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूर व वितरित करण्यात आलेल्या 750 कोटींच्या निधीसह त्याआधी वितरित करण्यात आलेल्या सहा हजार 559 कोटी 36 लाख 65 हजार रुपयांच्या निधीचा समावेश आहे.

क्लिक करा : औरंगाबाद,जालन्यातील तीन अवैध सावकारांवर कारवाई

आजवर कोकण विभागाला 131 कोटी 30 लाख 98 हजार, नाशिक विभाग 1825 कोटी 22 लाख 48 हजार, पुणे विभाग 483 कोटी 39 लाख 64 हजार, औरंगाबाद 3100 कोटी 61 लाख 35 हजार, अमरावती विभाग 1615 कोटी 95 लाख 56 हजार तर नागपूर विभागासाठी 152 कोटी 86 लाख 64 हजार रुपयांच्या निधीचा समावेश असल्याचे एक फेब्रुवारीच्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. 

go to top