लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी औरंगाबादेत हे घडले गुन्हे अन् घटनाही 

crime
crime

वाहनाच्या धडकेत तरुण ठार 
औरंगाबाद ः
पडेगाव शरणापूर रस्त्यावर वळण घेत असताना एका वाहनाची धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान २४ मार्चला मृत्यू झाला. ही घटना १८ मार्चला छावणी भागातील रॉयल ऑटो गॅरेजसमोर घडली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, कलंदर रसूल शेख असे मृताचे नाव आहे. तो पडेगाव ते शरणापूर रस्त्याने दुचाकीवरून जात होता. त्यावेळी उजवीकडे वळण घेताना कलंदर शेख यांना वाहनाची धडक बसली.

यात ते गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा २४ मार्चला मृत्यू झाला. त्यांचे मेहुणे शेख मोहम्मद शेख गफूर (रा. मिटमिटा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वाहनचालक दशरथ महादेव उईके (रा. पडेगाव) यांच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

पर्ससह पन्नास हजारांचा ऐवज लंपास 
औरंगाबाद -
सिडको बसस्थानकातून खामगाव येथे जाण्यासाठी आलेल्या महिलेची पर्स लंपास झाल्याची घटना १८ फेब्रुवारीला घडली. पर्समध्ये रोख १५ हजारांसह पन्नास हजारांचा ऐवज होता. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

घरमालकावर गुन्हा दाखल 

औरंगाबाद ः बंधनकारक असतानाही भाडेकरूची माहिती न देणाऱ्या घरमालकाविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. याबाबत पोलिस हवालदार गोकुळ बाबूलाल लोधवाल यांनी तक्रार दिली की, चंद्रकांत लक्ष्मीकांत शिरखेडकर (रा. एन-पाच, सिडको) यांनी त्यांच्याकडे असलेल्या भाडेकरूची माहिती दिली नाही. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

मथुरानगरात गुटखा विक्रेत्यावर छापा 

औरंगाबाद ः मथुरानगर सिडको एन-सहा येथे गुटखा विक्रेत्यावर पोलिसांनी छापा घातला आणि सुमारे ४५ हजारांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. २३ मार्चला रात्री ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सलीम कुतुबुद्दीन अन्सारी हे मथुरानगर, सिडको एन-सहा भागात राहतात. त्यांच्याकडे बंदी असलेला सुगंधित पानमसाला व गुटख्याचा माल साठवून ठेवल्याची माहिती अन्न व औषधी सुरक्षा अधिकारी आणि पोलिसांना समजली.

त्यानंतर या विभागाच्या दोन्ही पथकांनी मथुरानगर येथे सलीम अन्सारी यांच्याकडे छापा घातला. त्यावेळी पथकाला सुगंधित पानमसाला, गुटख्याचा माल आढळला. पथकाने ४५ हजार ३८० रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी संशयित सलीम अन्सारी यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 


दारूविक्री करणाऱ्यावर गुन्हा 

ॅऔरंगाबाद ः दारूविक्री करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून ९३६ रुपयांची दारू जप्त केली. ही कारवाई २३ मार्चला आझाद चौक सिडको येथे करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सचिन सुखदेव खरात (रा. पिसादेवी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

दुकान उघडे ठेवणाऱ्यावर गुन्हा 

औरंगाबाद ः कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यातच दुकान उघडे ठेवणाऱ्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, हमीद अहेमद वहीद नदीमखान (वय ४५) असे संशयिताचे नाव आहे. ते फ्रेश बेक दुकानाचे व्यवस्थापक आहेत. त्यांनी दुकान उघडे ठेवून पाच व त्यापेक्षा अधिक व्यक्ती जमवून कायद्याचा भंग केला, असे पोलिस शिपाई शिवाजी भोसले यांनी तक्रारीत नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com