
काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे बुधवारी (ता. दोन) सकाळी साडेसहा वाजता निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता दहेगाव (ता. वैजापूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
औरंगाबाद/ वैजापूर : काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे बुधवारी (ता. दोन) सकाळी साडेसहा वाजता निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता दहेगाव (ता. वैजापूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते.
पोलिसांच्या विनंतीचा मान राखत आंदोलन मागे, पण उद्या मशिद उघडणार : खासदार...
काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांची प्रकृती मधुमेहाचा त्रासामळे काही दिवसांपूर्वी खालावली होती. त्यामुळे त्याना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तालुक्यातील दहेगाव येथे १९७० साली सरपंच पदापासून आपल्या राजकरणाचा श्रीगणेशा करणारे रामकृष्ण बाबा यांच्या कारकीरदीला खरा बहर आला तो १९८५ साली. यावर्षी त्यांनी वैजापूर तालुक्याचे आमदार पद भूषविले. हे पद १९९५ पर्यंत त्यांनी कायम ठेवले.
याशिवाय १९९९ साली त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर खासदारकी मिळवली. शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांचा त्यांनी पराभव केला होता. रामकृष्ण बाबांनी पंचायत समितीचे सभापती पद, तर २५ वर्ष जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट कॉप-आप बँकेचे पाच वर्ष संचालक म्हणूनही बाबांनी काम केले. सध्या औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. बुधवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात अप्पासाहेब पाटील, वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती काकासाहेब पाटील ही दोन मुले, सुन तथा जिल्हा परिषद सदस्य वैशाली पाटील, दोन मुली, जावई, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
(संपादन - गणेश पिटेकर)