'सरकारने आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणावर ७ टक्क्यांची तरतूद करावी'

सुनिल इंगळे
Monday, 15 February 2021

औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी (ता.१५) औरंगाबाद विभागातील जिल्ह्यातील २०२१-२२ सर्वसाधारण जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडत आहे

औरंगाबाद: राज्याच्या अर्थसंकल्पात ७ टक्क्यांची तरतूद ही आरोग्य व वैद्यकीय शिक्षणासाठी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. 

औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी (ता.१५) औरंगाबाद विभागातील जिल्ह्यातील २०२१-२२ सर्वसाधारण जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडत आहे. यात अर्थ मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूर जिल्ह्याचा आढावा घेतला. यानंतर देशमुख यांनी पत्रकाराशी संवाद साधला.

अखेर क्लासेसचा मार्ग मोकळा! अनलॉक होताना पाळावे लागणार कोरोनाचे नियम

यावेळी ते म्हणाले की, लातूर जिल्ह्याच्या नियोजन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यात वीज, रस्ते, पाणदरस्ते आरोग्य विषयासाठी जिल्ह्याला भरीव निधीची आवश्यकता आहे. यासाठी अर्थमंत्री अजित पवार जिल्ह्यासाठी भरीव तरतूद असेल असंही सांगितलं. 

दरम्यान केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्रात या वर्षी मोठी तरतूद केली आहे. यावर देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले, जागतिक महामारीत आरोग्य विभागाने मोठी जबाबदारी घेत काम पाहिले, या क्षेत्रात उत्तम व्यवस्था उभारण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र शासनाने आरोग्य व वैद्यकीय शिक्षण या क्षेत्रात ७ टक्के तरतूद करावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात अली आहे. गेल्या वर्षी या आरोग्य विभागावर 3.५ टक्क्याची तरतूद केली होती.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government should provide 7 percent for health and medical education amit deshmukh