esakal | औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत वाढले हरभऱ्याचे क्षेत्र; पाच लाख ४८ हजार हेक्टरवर पेरणी
sakal

बोलून बातमी शोधा

chickpea

औरंगाबाद विभाग कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये यंदा हरभऱ्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत वाढले हरभऱ्याचे क्षेत्र; पाच लाख ४८ हजार हेक्टरवर पेरणी

sakal_logo
By
मधुकर कांबळे


औरंगाबाद : औरंगाबाद विभाग कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये यंदा हरभऱ्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. विभागांतर्गत तीन जिल्ह्यातील ६ लाख ६४ हजार हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ५ लाख ४८ हजार हेक्‍टरवर अर्थात ८२.५३ टक्‍के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. लांबणीवर पडलेल्या पावसाचा थेट रब्बी पेरणीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.


औरंगाबाद जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८ हजार १८८ हेक्‍टर क्षेत्र आहे. याच्या तुलनेत केवळ ५४.८१ टक्‍ म्हणजे १ लाख १४ हजार ९७ हेक्‍टरवर रब्बी पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७४ हजार ३६८ हेक्‍टर आहे. तथापि प्रत्यक्षात ९२ टक्‍के क्षेत्रावर म्हणजे १ लाख ६० हजार ८६५ हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत. बीड जिल्ह्यात २ लाख ८१ हजार ४८० हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ९७ टक्‍के क्षेत्रावर म्हणजे २ लाख ७३ हजार ९० हेक्‍टरवर रब्बी पेरणी झाली आहे.

१ लाख ८७ हजार हेक्‍टरवर हरभरा
औरंगाबाद, जालना व बीड हे तीन जिल्हे मिळून हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ६९ हजार ५४७ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत हरभऱ्याची सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जावून ११० टक्‍के क्षेत्रावर अर्थात १ लाख ८७ हजार ६८२ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. इतर कडधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र ११८ हेक्‍टर ८० गुंठे असतांना प्रत्यक्षात इतर कडधान्यांची ३०१ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

पीकनिहाय पेरणी
गहू : ९३ हजार ४३१ हेक्‍टर
मका : २५ हजार ४३० हेक्‍टर
इतर तृणधान्य : ९३५ हेक्‍टर
करडई : ३३१ हेक्‍टर
जवस : ११२ हेक्‍टर
तीळ : २ हेक्‍टर
सुर्यफूल : २७६ हेक्‍टर
मोहरी : २९ हेक्‍टर
इतर गळीतधान्य : ८६ हेक्‍टर

Edited - Ganesh Pitekar