esakal | पिके झाली आडवी, रस्ते पुल गेले वाहुन
sakal

बोलून बातमी शोधा

पिके झाली आडवी, रस्ते पुल गेले वाहुन

एकट्या गंगापुर तालुक्यात सरासरी तब्बल ७५.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तुर्काबाद मंडळात तर ढगफुटीसारखी पाऊस झाला असून १५६.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

पिके झाली आडवी, रस्ते पुल गेले वाहुन

sakal_logo
By
शेखलाल शेख


औरंगाबादः जिल्ह्यात गुरुवार (ता.१७) रात्री झालेल्या जोरदार पावसाने गंगापुर, औरंगाबाद, कन्नड, सोयगाव तालुक्यातील काही गावांना झोडपुन काढल्याने पिके आडवी झाली, नद्या नाल्यांना पुर आला तर अनेक ठिकाणी रस्ते, पुल वाहुन गेले. गुरुवार (ता.१७) राज्य शासनाच्या महा रेन च्या आकडेवारीनुसार रात्री औरंगाबाद जिल्ह्यातील आठ मडंळात अतिवृष्टीची नोंद झाली. एकट्या गंगापुर तालुक्यात सरासरी तब्बल ७५.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तुर्काबाद मंडळात तर ढगफुटीसारखी पाऊस झाला असून १५६.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महा रेन च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरी २६.२ मिलीमीटर तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंदीनुसार सरासरी १७.४० मिलीमीटर पाऊस झाला. 

गंगापुर तालुक्यातील सहा मंडळात अतिवृष्टी 

महा रेन च्या आकडेवारीनुसार गंगापुर तालुक्यातील गंगापुर मंडळात ७२, मांजरी ६७.३, भेंडाळा ८३.८, तुर्काबाद १५६.५, वाळुज ८१.८, सिद्धनाथ ७६.८ मिलीमीटर म्हणजेच अतिवृष्टीची नोंद झाली तर डोणगाव मंडळात ६१.८, शेंदुरवादा ५०.३ तर हर्सुल मंडळात २७.३ मिलीमीटर पाऊस झाला. गंगापुर तालुक्यात शुक्रवार (ता.१८) सकाळी अकरापर्यंत ७५.३ मिलीमीटर पावसाची महा रेन च्या आकडेवारीनुसार नोंद झाली तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंदीनुसार ४८.२२ मिलीमीटर पाऊस झाला.

हेही वाचा- जायकवाडीचे 27 दरवाजे उघडले

औरंगाबाद तालुक्यात पाऊस 

महा रेन च्या नोंदीनुसार औरंगाबाद तालुक्यात ३३.१ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये औरंगाबाद मंडळात ५.५, उस्मानपुरा ४५.५, भावसिंगपुरा ११.३, कांचनवाडी ३८.५, चिकलठाणा ४३.५, चित्तेपिंपळगाव ३९.८, करमाड ४२, लाडसावंगी ३९.५, वरुडकाजी ४३ तर चौका मंडळात २२.३ मिलीमीटर पाऊस झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार औरंगाबाद तालुक्यात १६.१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

पैठण मध्ये २६ मिलीमीटर पाऊस 

पैठण तालुक्यात महा रेन च्या नुसार सरासरी २६.२ मिलीमीटर तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २१.४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महा रेन च्या आकडेवारी नुसार आडुळ ४४, पिंपळवाडी २६.२, बाळानगर २१.३, नांदर २६.२, लोहागाव २६.५, ढोरकीन ३०, बिडकीन ४२.८, पैठण ११.३, पाचोड ६.३ तर विहामांडवा २०.५ मिलीमीटर पाऊस झाला. 

कन्नड तालुक्यातील करंजखेड मध्ये ८७ मिलीमीटर पाऊस 

महा रेन च्या नुसार वैजापुर तालुक्यात लासुरगाव ४२.५, महालगाव ३८.३, नागमठाण ३६.३ या मंडळात चांगला पाऊस झाला. कन्नड तालुक्यातील करंजखेड मंडळांत ८७ मिलीमीटर तर सोयगाव तालुक्यातील बनोटी मंडळात ८०.८ मिलीमीटर पाऊस झाला.