महत्त्वाची बातमी! राज्यात बांधकामासाठी 'एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली'; सामान्यांना होईल फायदा

मधुकर कांबळे
Saturday, 13 February 2021

1500 स्केअर फुटातील निवासी घरांसाठी कोणत्याही बांधकाम परवानगीची गरज भासणार नाही

औरंगाबाद: राज्यात सध्या वेगवेगळ्या शहरात वेगवेगळी विकास नियंत्रण नियमावली आहे. यामुळे बांधकामे करण्यासाठी नागरिकांना अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्यात एकच विकास नियंत्रण नियमावली असली पाहीजे यासाठी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली आणि प्रोत्साहन नियमावली (युनिफाईड डीसीआर) लागू केली आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. 

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी ( ता.13) औरंगाबादमध्ये आले होते. विविध बैठकांनतर पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना म्हणाले, या युनिफाईड डीसीआरमुळे एफएसआयचा दुरुपयोग होणार नाही. एफएसआयमधील संदिग्धता दूर करून यामध्ये स्पष्टता आणली आहे. वाढीव क्षेत्रफळामुळे लोकांना परवडणारी घरे मिळणार आहेत. घरांच्या किंमती नियंत्रणात राहतील.

'शिवजयंती निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील'

तसेच पुढे बोलताना मंत्री शिंदे म्हणाले की. 1500 स्केअर फुटातील निवासी घरांसाठी कोणत्याही बांधकाम परवानगीची गरज भासणार नाही. बांधकामाचा नकाशा आणि स्क्रुटनी फी भरून ते बांधकाम करु शकतील. तसेच 3000 स्के. फु. घरांना बांधकाम परवानगी देणे बंधनकारक केलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या बांधकाम परवान्यासाठी चकरा कमी होतील आणि अनधिकृत बांधकामे वाढणार नाहीत. 

31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारीतील घरे नियमित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. याचा 55 हजार घरांना फायदा होणार असल्याचेही मंत्री शिंदे यांनी सांगितले

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important news Integrated Development Control Regulations for construction in the state