'ही घटना दुर्दैवी', टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेना मंत्र्यांची प्रतिक्रिया

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 13 February 2021

राज्यात सध्या पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरण मोठं गाजत आहे. यावर शिवसेना नेत्याने भाष्य केलं आहे

औरंगाबाद: आज राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दोऱ्यावर आहेत. शहरात शिंदे आज वेगवेगळ्या विकासकामांचा आढावा घेत आहेत. राज्यात सध्या गाजत असलेल्या पुजा चव्हाण प्रकरणावरही बोलताना शिंदे म्हणाले की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

तसेच शिवजयंतीनिमित्ती शासनाने नियमावली जाहीर केली आहे. 100 लोकांपेक्षा जास्त लोकांमध्ये जयंती साजरी करु नये असे शासनाचे निर्देश आहेत. या निर्णयाला सर्वत्र विरोध होत आहे. त्यामुळे शिवजयंती साजरी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य निंर्णय घेतील, अजूनही कोरोना आहे असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

"दिल्ली, नोएडा पाठोपाठ आता औरंगाबाद शहरात चार्जिंग सेंटर' 

आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना शिंदेनी पूजा चव्हाण प्रकरणी प्रतिक्रिया दिली. ही घटना दुर्दैवी असून हे प्रकरण संवेदनशील आहे. जोपर्यंत या प्रकरणात सर्व माहिती समोर येत नाही तोपर्यंत त्यावर बोलणं योग्य होणार नाही असं शिंदे यांनी सांगितलं.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This incident unfortunate ShivSena minister reaction Puja Chavan suicide case