फडणवीस असो की ठाकरे सरकार,  शेतकऱ्यांच्या माफीची औकात आहे का? (शेतकरी संघटनेच्या बैठकीत सूर) 

सुषेन जाधव
Thursday, 16 January 2020

शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी (ता.15) औरंगाबादेतील गांधी भवनमध्ये पार पडली. यावेळी काही ठरावही घेण्यात आले. शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या बैठकीला अध्यक्ष रघुनाथ पाटील, कालिदास आपेट, ऍड. अजित काळे, महिला कार्यकारिणी अध्यक्षा विमल आकणगिरे (रेणापूर), शिवाजी नाना नांदखिले, बंडू सोळंके, बाळासाहेब पटारे, दत्ता कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

औरंगाबाद : शेतकरी घाम गाळून पिकवितो. त्याचा दाम त्याला मिळालाच पाहिजे. फडणवीस असो की ठाकरे सरकार, कर्जमाफी या गोंडस शब्दाच्या नावाखाली शेतकऱ्यांना माफ करण्याची औकात आहे का? करायची तर कर्जमुक्ती करा, असा सूर शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बुधवारी (ता.15) निघाला. औरंगाबादेतील गांधी भवनमध्ये ही बैठक पार पडली. यावेळी काही ठरावही घेण्यात आले.

हेही वाचा- गडकरींचे विधान स्वपक्षातील नेत्याला उद्देशूनच : चंद्रकांत खैरे 

शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या बैठकीला अध्यक्ष रघुनाथ पाटील, कालिदास आपेट, ऍड. अजित काळे, महिला कार्यकारिणी अध्यक्षा विमल आकणगिरे (रेणापूर), शिवाजी नाना नांदखिले, बंडू सोळंके, बाळासाहेब पटारे, दत्ता कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

क्लिक करा- घाटी रुग्णालयातील सेंट्रल लिक्विड ऑक्‍सिजनचा प्रस्ताव बारगळला 

...तर शरद पवारांनी माफी मागावी 
बैठकीदरम्यान उपस्थित रघुनाथदादा पाटील म्हणाले, की कितीही आघाड्या केल्या, सत्ता मिळविली; पण अजूनही शेतकऱ्यांचे आम्ही भले करू शकलो नाही, असे म्हणत शरद पवार यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. कॉंग्रेसच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या झाल्याचेही त्यांनी टीकास्त्र सोडले. केवळ राजकीय पक्षांना दोष देण्यापेक्षा शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी संघटन करण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा- तीनशे कोटींच्या कामांच्या चौकशीला का दिली मुदतवाढ

हे झाले ठराव 

केंद्र सरकारच्या ई-नाम या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करवून घेणे, बळिराजा पक्षातर्फे राज्यभर निवडणुका लढविणे आणि सातबारा कोरा करण्याची पूर्तता न झाल्याने; तसेच फसवी कर्जमाफी केल्याविरोधात आंदोलने करून त्याचा लाभ मिळविणे; तसेच दोन कारखान्यांतील 25 किलोमीटरची अट रद्द करण्यासाठी लढा उभारणे या ठरावांचा समावेश आहे. 

हेही वाचा- मुलाला शाळेतून घरी घेऊन जात होती, चर्रकन चिरला तिचा गळा!

शेतकी कर्जाचे लक्ष्यच अपूर्ण 
कालिदास आपेट म्हणाले, की रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार शेतकी कर्ज 19 टक्के असायला हवे; मात्र यंदा केवळ नऊ टक्के शेतकी कर्ज दिल्याचा आकडा आहे. श्री. अपेट यांनी शरद जोशींचा दाखला देत माफी ही गुन्हेगारांना करतात, शेतकरी कसला गुन्हेगार आहे असा जाब सरकारला विचारणार असल्याचे बैठकीत सांगितले. मुळात कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती द्या, असा संघटनेचा दावा असल्याचेही ते म्हणाले. 

हे वाचलंत का?- "त्या' लेखकावर गुन्हे दाखल करा - मराठा क्रांती मोर्चा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is It Phadanvis Or Thackeray Government, No One Really Helping Farmers, Shetkari Sanghatna Claim