भाजपचे हिंदुत्व मनुवादी तर शिवसेनेचे सेक्‍युलर- जोगेंद्र कवाडे 

शेखलाल शेख
मंगळवार, 14 जानेवारी 2020

औरंगाबाद : राज्यात सत्तेबाहेर गेलेल्या भाजपकडून सातत्याने शिवसेनेच्या हिंदुत्वावर टिका केली जात आहे. भाजप आणि शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये खुप फरक आहे. भाजपचे हिंदुत्व हे मनुवादी तर शिवसेनेचे हिंदुत्व हे सेक्‍युलरवादी आहे. प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा शिवसेनेकडे आहे असे मत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

हेही वाचा : म्हणून विद्यापीठाच्या गेटवर येतात लाखो भीमसैनिक

कवाडे म्हणाले की, केंद्र सरकारचे धोरण शेकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. फडणवीस सरकारने फक्त घोषणा केल्या परंतू शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार चांगले काम करत आहे.

कर्जमाफी केल्यानंतर दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळावी यासाठी चाचपणी सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल असे सुचक विधान त्यांनी केले.

हेही वाचा : भाजपकडून धर्माधर्मावरुन भेदाचे राजकारण- आनंदराज आंबेडकर 

भाजपाकडून उठसूट कोणत्या न कोणत्या पद्धतीने ताशेर ओढत महाआघाडी सरकारला विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्यातील सरकार उद्धव ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्त्वाखी सर्वजण एकजूटीने, एकोप्याने काम करत असल्याने सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करेल. 

देशात कोंडवाडा बनविला जात आहे 

एनआरसी, सीएए कायदा लागू करून देशात पुन्हा एकदा भेदाचा डाव भाजपाने आखला आहे. त्यामुळे देशामध्ये कोंडवाडा बनवला जात आहे. हीच प्रवृत्ती देश विघातक असल्याची टिका त्यांनी केली. जर देश अखंडीत ठेवायचा असले तर हिंदू सेक्‍यूलर असणे काळाची गरज आहे. हिंदू सेक्‍यूलर राहिला तर देशाची अखंडता एकत्र टिकून राहिल असे प्रा. कवाडे म्हणाले. शिवाय जेएनयु विद्यापीठाच्या कुलगुरुंना हटवा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jogendra Kawade Hindutva statement Aurangabad News