कोट्यावधी रुपयांच्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांना पकडले, वन विभागाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 March 2021

या कारवाईत नऊ आरोपींसह एक चारचाकी, दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. या नऊ जणांविरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

औरंगाबाद: सिल्लोड वन विभागाच्या अजिंठा वन परिक्षेत्रातून खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या नऊ जणांना बुधवारी (ता.३) वन विभागाने ताब्यात घेतले. खवल्या मांजराची सुटका करण्यात आली. (अंदाजे चार कोटी रुपये किंमतीचे हे मांजर आहे) विशेष म्हणजे जागतिक वन्य जीव दिनी ही करावाई करण्यात आली आहे. यामुळे या परिक्षेत्रात वन्य जीव सुरक्षित नसल्याची बाब पुन्हा समोर आली आहे. 

एक वन्यजीव प्राण्याची तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार सिल्लोड-अजिंठा रोडवरील हॉटेल लाडली जवळ नाके बंदी करण्यात आली. यावेळी आलेल्या एक वाहनातून (एम एच २० बीवाय ७३०७) मधून संशयस्पद हालचाली दिसून आल्या. यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनातील लोकांची अधिक चौकशी केली असता, हे लोक अनाड शिवारात खवल्या मांजर असून त्यांची विक्री करीता जात असल्याचे सांगितले. तेव्हा वन विभागाने सापळा रचत अनाड येथून एका कापडी पिशवीत ठेवलेल्या मांजर आणि तीन अरोपींना ताब्यात घेतले.

वा रे माझ्या पठ्ठ्या, सालगड्याचा मुलगा झाला अधिकारी

या कारवाईत नऊ आरोपींसह एक चारचाकी, दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. या नऊ जणांविरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उप वनसंरक्षक सुर्यकांत मंकावार, सहाय्यक वनसंरक्षक डी.आर. वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद गायके, वनपरिक्षेत्र अधिकारी स्टाईक फोर्स यांच्या संयुक्त ही कारवाई करण्यात आली आहे.कारवाईसाठी वाइल्ड लाइफ वॉर्डन सातारा येथील रोहन भाटे यांचे विशेष सहकार्य लाभले . पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे करीत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khavlya manjar smugglers caught worth crores of rupees action taken by Forest Department