esakal | औरंगाबाद : वाळूज परिसरात कडक लॉकडाउन
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown at Waluj

जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांनी केली पाहणी 

औरंगाबाद : वाळूज परिसरात कडक लॉकडाउन

sakal_logo
By
आर. के. भराड

वाळूज (जि. औरंगाबाद) : दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाळूज परिसरात शनिवारपासून (ता.चार) कडक लॉकडाउनला सुरवात झाली आहे. १२ जुलैपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. त्याला स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी शनिवारी कडकडीत बंद पाळत प्रतिसाद दिला. दरम्यान, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.  

वाळूज परिसरातील कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे येथील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांच्या मागणीनुसार चार ते १२ जुलैदरम्यान नऊ दिवसांचा लॉकडाउन सुरू झाला. लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार किशोर देशमुख यांनी बजाजनगर, पंढरपूर व वाळूज या भागाला भेट देत पाहणी केली.

....म्हणून अमेरिका, ब्राझील अन् युरोपात कोरोना संक्रमणाचा वेग सर्वाधिक

दरम्यान, उद्योग, दवाखाने व औषधी या व्यतिरिक्त कुठलीही दुकाने उघडी नव्हती. त्यामुळे प्रशासनाने पुकारलेल्या बंदला पहिल्याच दिवसी मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण लांडेपाटील, पंढरपूरचे सरपंच शेख अख्तर भाई, उपसरपंच महेंद्र खोतकर, सुनील काळे उपस्थित होते. 
 
बजाजनगर येथील बळींची संख्या चारवर 
बजाज कंपनीच्या आणखी एका कामगाराचा घाटी रुग्णालयात कोरोना आणि इतर आजाराने शनिवारी मृत्यू झाला. त्यामुळे बजाजनगर येथील बळींची संख्या चारवर गेली आहे. दरम्यान, स्वॅब घेतलेल्या १११ जणांपैकी केवळ २९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे येथील रुग्णसंख्येत घट होत असल्याने समाधान व्यक्त केल्या जात आहे. 

भगवान बुद्धांनी जगाला जगण्याचा मार्ग दाखवला : मोदी