इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना ठणकावले...

शेखलाल शेख
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

राजकारणात तुम्ही इतकी वर्ष आहात तुमच्या कानाला मशिदीवरील भोंग्यांचा आताच त्रास व्हायला लागला का? तुमच्यात हिंमत असेल तर मग केंद्र सरकारकडे जाऊन तक्रार करा, असा टोला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला. 

औरंगाबाद :  राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिवेशनात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा काढताच एमआयएमचे नेते संतप्त झाले आहे. देशात अनेक प्रश्‍न असतांना मशिदींवरील भोग्यांचा मुद्दा आजच्या स्थिती इतका महत्वाचा आहे. राजकारणात तुम्ही इतकी वर्ष आहात तुमच्या कानाला मशिदीवरील भोंग्यांचा आताच त्रास व्हायला लागला का ? तुमच्यात हिंमत असेल तर मग केंद्र सरकारकडे जाऊन तक्रार करा असा टोल एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला.

क्लिक करा : औरंगाबादच्या खेळाडूंनी का दिला पुरस्कार वापसीचा इशारा, वाचा...

मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेत पुन्हा एकदा बांगलादेशी , पाकिस्तानी, घुसखोर आणि मशिदीवरील भोंग्याचा विषय काढला. आमच्या आरतीमुळे कुणाला त्रास होत नाही, मग भोंग्यावरील नमाज कशासाठी? असा सवाल करत राज ठाकरे यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल कशी असेल हे स्पष्ट केले होते. मशिदीवरील भोंगे या विषयाला राज ठाकरे यांनी हात घातल्यानंतर यावर एमआयएमकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. 

यावर खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, इतके दिवस राज ठाकरे हे सेक्‍युलर होते. आता मात्र मतांसाठी ते असे मुद्दे काढत आहे. पक्षाचा झेंडा बदलणे आणि हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी मशिदीवरील भोंग्याना विरोध करणे, सीएए ला समर्थन करणे हा त्याचाच एक भाग आहे. आजच्या स्थितीत मशिदींवरील भोंगे हा इतका महत्वाचा मुद्दा वाटतो का ? अशा सभेत बोलुन काय होणार आहे ? हिंमत असेल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी, अमित शाह यांना भेटुन भोंग्यांची तक्रार करावी.

हेही वाचा : बंदला गालबोट औरंगाबादेत सिटी बसवर दगडफेक 

ज्यांचा एक ही खासदार नाही, फक्त एक आमदार आहे. अगोदर तुमचे आमदार, खासदार निवडुण राजकीय वजन तरी वाढावयला हवे होते. आता त्यांना लगेचच मशिदीवरील भोंग्याचा देखील यांना त्रास होऊ लागला आहे अशी टिका इम्तियाज जलील यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loudspeakers blaring mosques Raj Thackeray imtiaz jaleel aurangabad