मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन 

शेखलाल शेख
Monday, 13 January 2020

पुंडलिकनगर येथे "आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकाचा तीव्र शब्दात निषेध करुन जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

औरंगाबादः मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि गोयलच्या पुतळ्याचे दहन केले. पुस्तकावर तातडीने बंदी घातली पाहिजे, पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. मराठा क्रांती मोर्चातर्फे गोयल यांच्या विरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातही तक्रार दिली. तसेच काही भाजप नेते, गोयलच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

हेही वाचा : तुमचे आरक्षण काढले जाईल हा अफवा : देवेंद्र फडणवीस

पुंडलिकनगर येथे "आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकाचा तीव्र शब्दात निषेध करुन जोडे मारो आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही.

महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तुलना करुन अवमान करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाची कुणी ही बरोबरी करु शकत नाही. 

या पुस्तकाच्या माध्यमातून खोडसाळपणा करुन समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. यामाध्यमातून अपमान करणे आणि समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा : ती पोलिस भरतीची तयारी करत होती, पण...

या प्रकरणामागे राजकारण असून याची चौकशी झाली पाहिजे. या पुस्तकावर तात्काळ बंदी घालुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रमेश केरे, रविंद्र काळे, अशोक मोरे, किरण काळे, शुभम केरे, धनंजय देशमुख, राहुल मुगदल, संकेत शेटे यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Moracha Andolan Aurangabad News