मराठवाड्याचं सौंदर्य; बीड, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळे

प्रकाश बनकर
Thursday, 28 January 2021

मागील लेखात आपण मराठवाड्यातील मुख्य जिल्हा असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेतली. या लेखात मराठवाड्यातील महत्त्वाच्या तीन जिल्ह्यातील पर्यटनस्थळांबद्दल जाणून घेणार आहोत

औरंगाबाद: मागील लेखात आपण मराठवाड्यातील मुख्य जिल्हा असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेतली. या लेखात मराठवाड्यातील महत्त्वाच्या तीन जिल्ह्यातील पर्यटनस्थळांबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामध्ये बीड, उस्मानाबाद आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे-
बीड जिल्हाही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बीड जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ मंदिर आहे. यासह तलावाच्या मधोमध असलेले एक हजार वर्षे जुने कंकालेश्वर मंदिर आहेत. तसेच अंबाजोगाई श्री.योगेश्वरी ही अंबानगरीचे एक भूषण आहे. तसे पहिले तर अंबानगरीने साहित्यिक व सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रीय मनाला अभिमान वाटावा अशी आहे.

खरेदीकेंद्राकडून कापसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांकडे...

हजरत शहेनशहावली दर्गा हजरत शहेनशहावली १४ व्या शतकातील चिस्तीया जमातीपासून सुफी होते. ते महम्मद तुघलकच्या शासनकाळात बीड येथे आहे. आद्यकवी श्री मुकुंदराज महाराजांची अंबाजोगाईत समाधी येथेआहे. त्यांच्या वायव्य दिशेस ५ किलो मीटर अंतरावर आहे. त्यांनी विवेक सिंधू हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ लिहला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे-
मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण जिल्ह्यात तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. जगदंबा मातेची मूर्ती अष्टभुजा आहे. आश्विन व चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. यात्रेला देशभरातून लाखो भाविक येतात. उस्मानाबाद शहरापासून ४६ किलोमीटर अंतरावर असलेले नळदुर्ग किल्ल्यातील पाणी महाल प्रेक्षणीय व प्रसिद्ध आहे. हा प्रचंड किल्ला अडीच किलो मीटर घेराचा असून विषेश म्हणजे अजूनही हा सुस्थितीत आहे.

हिंगोली : बोल्डा येथे अज्ञात आजाराने दोनशे कोंबड्या दगावल्या

उस्मानाबाद लेणी शहराच्या अवघ्या आठ किलोमीटर ही प्राचीन लेणी आहेत. यासह परंडा किल्ला हा कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिमंडा (परंडा)हा एक महत्त्वाचा परगणा होता. तेथील किल्ला हा ३५ मिटर लांब तेवढाच रुंद आहे. बहामनी राजवटीत मुहमदशहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने तो बांधलाची इतिहास आहे.

यासह उस्मानाबाद पासून २२ किलोमीटरवर तेर या गावी प्राचीन संस्कृतीच्या पाउलखुणा आजही स्पष्ट जाणवतात. प्राचीन काळात परदेशी व्यापार संबंध असलेले तेर हे गाव प्रख्यात राष्ट्रीय संत गोरोबाकाका कुंभार यांच्यामुळे महाराष्ट्राला ज्ञात आहे. या गावात जुने राहते घर असून तेरणा नदीच्या काठावर त्यांची समाधी असलेले मंदिर आहे. तर येथील काही मंदिरे स्थापत्यशास्त्राच्या बांधकामामुळे प्रसिद्ध आहेत. गावाच्या आग्नेय दिशेला श्री नृसिंहाचे एक जुने मंदिर आहे. तर गावच्या मध्यभागी त्रिविक्रमाच्या भव्य अशा मूर्ती समोर विष्णूची मूर्ती आहे.

उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती राज्य सरकारद्वारेच; PPP ची अट...

परभणी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे-
परभणी जिल्ह्यातील पाथरी हे साईबाबांचे जन्मगाव आहे. येथे साईबाबांचे मंदिर आहे. यासह जिंतूरपासून तीन किलोमीटर अंतरावर नेमागिरि नामक दोन टेकड्या आहेत आणि चंद्रगिरी ही प्राचीन ज्योतिर्लिंग आणि चमत्कारिक जैन गुहा मंदिर व चैत्यलय्यांसाठी जगप्रसिद्ध आहेत. यासह श्री नेमिनाथ भगवान दिगंबर जैन मंदिर नवागढ हे भगवान नेमिनाथच्या प्राचीन आणि कलात्मक मूर्तीने प्रसिद्ध आहे.

परभणी शहरालगत असलेला हजरत तुरा बुल हक दर्गा, दरवर्षी आपल्या वार्षिक मेळासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये १०८ वर्षांचा इतिहास आहे, प्रत्येक वर्षी प्रत्येक धर्म आणि धर्म यांचे हजारो अनुयायी २ ते १५ फेब्रुवारी दरम्यान एकत्र होतात. हा दर्गा सर्व धर्मांमधील एकतेचे प्रतीक आहे. परभणीपासून १८ किलोमीटरवर पोखर्णी येथे नृसिंह मंदीर आहे. जिंतूर तालुक्यात चारठाणा येथे ऐतिहासिक महादेवाचे मंदिर आहेत. लेण्याप्रमाणेच कोरीव काम या मंदिराचे करण्यात आले आहे. तसेच परभणी येथे मृत्युंजय पारदेश्ववर मंदिर (पारद शिवलिंग) हे संगमरवरी मंदिर श्री स्वामी सच्चिदानजी सरस्वती यांनी बांधले आहे. परभणी जिल्ह्यातील एक धार्मिक स्थळ म्हणजे भगवान मुदगलेश्वराचे प्रसिद्ध मंदिरही आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada Famous tourist destinations in Beed Parbhani and Osmanabad districts