अजिंठा-वेरूळ लेण्या, घृष्णेश्वर मंदिर, जायकवाडी... जाणून घ्या औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळं

Sakal
Sakal

औरंगाबाद : मराठवाडा हा पर्यटनस्थळांच्या गोष्टीत वैभव संपन्न असा भाग आहे. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील पर्यटनस्थळे हे ऐतिहासिक वारसा जपत आहेत. अजिंठा-वेरूळ लेण्यामुळे जगभरातील पर्यटक मराठवाड्याच्या पर्यटन स्थळासं भेटी देत असतात. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळाचे वेगळे महत्त्व आहे.

आता अनलॉकडाऊन झाल्यापासून पूर्वीप्रमाणेच सर्वच पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे गजबजली आहेत. इतिहासाचे साक्षीदार असलेल्या मराठवाड्यातील पर्यटनाची प्रत्येकाने एकदा तरी वारी करायलाच पाहिजेत.

पर्यटनाची राजधानी असलेला औरंगाबादेत जगप्रसिद्ध वेरूळ-अजिंठा लेणी आहेत. त्यासह दख्खनचा ताज म्हणून ओळखले जाणारे बिबिका मकबरा, पाणचक्की, औरंगाबाद लेणी, पितळखोरा यासह गडकिल्ले हे बघण्यासाठी जगभरातून दरवर्षी लाखो पर्यटक येतात. पर्यटनस्थळाबरोबर जिल्ह्यातील धार्मिक स्थळालाही इतिहास लाभला आहेत. हाच इतिहास जाणू घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात. जिल्ह्यात यादवांच्या अगोदरच्या काळापासून देवगिरी किल्ला आहे.

वेरूळ लेणी, बघायला जाणारा प्रत्येक पर्यटक या किल्ल्यास भेट देतात. हाच किल्ला एकेकाळी देशाची राजधानी राहिला आहे. यासह कन्नड तालुक्यातील नागापूर गावाजवळ अंतूर किल्ला आहे. खान्देश पठारावरील एका टेकडीवर हा किल्ला आहे. १५ व्या शतकात मराठा सरदारांनी हा किल्ला बांधल्याचा इतिहास आहे. तसेच सिल्लोड तालुक्यात हा वेताळवाडी किल्ला आहे. सहाव्या शतकात गुप्त घराण्याचा राजा विक्रमादित्यने हा किल्ला बांधल्याच इतिहास आहे. वाडी गावाच्या पायथ्याशी हा किल्ला असल्याने त्यास वाडीचा किल्ला असेही म्हणतात.

औरंगाबादेतील चौका गावापासून डाव्या बाजूस १८ किलोमीटरवर लहुगड नांद्रा येथे रामेश्वर महादेवाचे ठिकाण आहे. महादेवाचे हेमाडपंती मंदिर असून ते डोंगराच्या मधोमध कोरलेले आहे. रामायणातील लव-कुश यांचे जन्मस्थळ म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते. सोयगाव तालुक्यात तालतम किल्ला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला प्रकारात मोडतो यासह भांगसीमाता गडकिल्ला, सुतोंडा किल्ला हे किल्ले जिल्ह्यात आहे.

यासह खुलताबादेत औरंगजेब यांची कबर आहेत. यासह बनीबेगम बाग, मलिक अंबर मकबरा, सुलीभंजन, वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर, पैठण येथील संत एकनाथ मंदिर, अपेगावात संत ज्ञानेश्‍वराचे जन्मस्थळ, जायकवाडी मातीचे धरण, पक्षी अभयारण्य, गौताळा अभयारण्य आहेत. यासह अनेक ऐतिहासिक मंदिरे धार्मिक स्थळे आहेत.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com