esakal | अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् तीन लाखांना गुजरातमध्ये विक्री, पोलिसांनी ठोकल्या एकाला बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

Arrest

अल्पवयीन मुलीच्या अपहरणानंतर तिला गुजरातेतील पालनपूर येथे तीन लाखांना विक्री केल्याप्रकरणी सिडको पोलिसांनी आणखी एका आरोपीला शुक्रवारी (ता. एक) सायंकाळी अटक केली.

अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् तीन लाखांना गुजरातमध्ये विक्री, पोलिसांनी ठोकल्या एकाला बेड्या

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीच्या अपहरणानंतर तिला गुजरातेतील पालनपूर येथे तीन लाखांना विक्री केल्याप्रकरणी सिडको पोलिसांनी आणखी एका आरोपीला शुक्रवारी (ता. एक) सायंकाळी अटक केली. यापुर्वी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनूसार, राहूल जितेंद्र डाबी (वय २४, रा. लालबाग, पालनपूर जि. बनासकंठा गुजरात) असे संशयिताचे नाव आहे. त्याला पाच जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एस. निंबाळकर यांनी शनिवारी (ता. दोन) दिले.

सिडको पोलिसांनी पालनपूर पोलिसांच्या मदतीने संशयिताच्या घरातून पीडितेला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता पीडितेला एक महिला व निलेश नामक व्यक्तीने विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेशी लग्‍न करुन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचेही संशयिताने कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सतरा वर्षीय पीडितेच्या वडीलांनी फिर्याद दिल्यानूसार, त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यातील पीडिता ही मोठी असून १६ ऑक्टोबरला बाहेर गेल्यानंतर पीडीत मुलगी घरी आलीच नव्हती. २६ डिसेंबरला पीडितेने वडीलांना फोन केल्यानंतर तिची गुजरातला विक्री केल्याचा उलगडा झाला होता.

Edited - Ganesh Pitekar