रेल्वेचा मेगाब्लॉक परभणीला  अन्‌ मनस्ताप औरंगाबादला 

अनिल जमधडे
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

-आठ ते दहा तास रेल्वे सेवा नसल्याने प्रवासी वैतागले 
-मधल्या मार्गावर अतिरिक्त सेवा सुरू करण्याची मागणी 

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेतर्फे परभणी मुदखेडदरम्यान 81.43 किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्यात येत आहे. या मेगाब्लॉकमुळे औरंगाबादच्या रेल्वेसेवर प्रचंड परिणाम झाला आहे. जवळपास 11 रेल्वे रद्द करण्यात आहेत. ज्या मार्गावर रेल्वे चालवता येणे शक्‍य आहे, त्या मार्गावर रेल्वे चालवण्याचे कुठलेही नियोजन न करण्यात आल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. 

मुदखेड ते परभणी दरम्यान 81.43 किलोमीटर दुहेरीकरणाचे काम दक्षिण मध्य रेल्वेतर्फे हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. 

चटका लावणारी "मॅट्रिक' ची कहाणी 

रद्द झालेल्या रेल्वेगाड्या 

परभणी-मुदखेड दरम्यानच्या कामामुळे नांदेड नगरसोल (क्र. 57542) 8 ते 14 फेब्रुवारीदरम्यान रद्द करण्यात आली. नांदेड-दौंड (क्र. 57516) ही 8 ते 14 फेब्रुवारीदरम्यान रद्द करण्यात आली. परभणी-नांदेड (क्र. 57512) 9 ते 11 आणि 13 व 14 फेब्रुवारीदरम्यान रद्द करण्यात आली आहे. नांदेड-औरंगाबाद-नांदेड (क्र. 07065/07066) 10 ते 15 फेब्रुवारी, हैदराबाद-औरंगाबाद (क्र. 57549) 9 ते 14 फेब्रुवारी, दौड-नांदेड 9 ते 14 फेब्रुवारी, औरंगाबाद-हैदराबाद (क्र. 57550) 10 ते 15 फेब्रुवारी, नागपूर-मुंबई नंदीग्राम (क्र. 11402) 11 ते 14 फेब्रुवारी, मुंबई-नागपूर नंदीग्राम (क्र. 11401) 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान, नांदेड-औरंगाबाद (क्र. 17620) 14 फेब्रुवारी आणि नगरसोल-काचीगुडा (क्र. 57652) 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

बलात्काऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप  

नियोजनाचा अभाव 

परभणी-मुदखेडदरम्यानच्या कामामुळे अनेक रेल्वेगाड्यांवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे ज्या मार्गावर रेल्वे चालवणे शक्‍य आहे. अशा मार्गावर अतिरिक्त रेल्वे गाड्यांची सोय करणे अपेक्षित आहे. औरगाबाद-मनमाड मार्गावर प्रवाशांना जाण्यासाठी केवळ दोन गाड्या सुरू आहेत. दुपारी अडीच वाजता नांदेड-मुंबई-तपोवन एक्‍स्प्रेसनंतर रात्री साडेदहा वाजता देवगिरी एक्‍स्प्रेसपर्यंत एकही गाडी मनमाड स्टेशनकडे जाण्यासाठी नाही. त्यामुळे तब्बल आठ तास रेल्वेगाडी नसल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच औरंगाबाद-नांदेड आणि परभणीपर्यंत अतिरिक्त रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

बलात्काऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About Railway Aurangabad