esakal | मी जप केल्यामुळे कोरोनाकाळात भारतात अमेरिकेसारखी स्थिती नाही, खैरेंचा अजब दावा
sakal

बोलून बातमी शोधा

CHANDRAKANT KHAIRE

नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन श्री. खैरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार अतुल सावे यांची, तर खासदार भागवत कराड, आमदार सतीश चव्हाण, अंबादास दानवे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, संस्थापक अध्यक्ष बबनराव डिडोरे, हिशाम उस्मानी, अध्यक्ष डी. डी. गव्हाड पाटील, उपाध्यक्ष दीपक पवार, कार्याध्यक्ष डाॕ. किशोर उढाण, सचिव अशोक दामले, राजाराम मोरे, बाळासाहेब हरबक, साहेबराव म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

मी जप केल्यामुळे कोरोनाकाळात भारतात अमेरिकेसारखी स्थिती नाही, खैरेंचा अजब दावा

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघाच्या कार्यालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना चिमटे काढले. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ‘मी ४४ हजार जप केल्यामुळे कोरोनाकाळात अमेरिकेसारखी स्थिती निर्माण झाली नाही,’ असा अजब दावा केला!

नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन श्री. खैरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार अतुल सावे यांची, तर खासदार भागवत कराड, आमदार सतीश चव्हाण, अंबादास दानवे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, संस्थापक अध्यक्ष बबनराव डिडोरे, हिशाम उस्मानी, अध्यक्ष डी. डी. गव्हाड पाटील, उपाध्यक्ष दीपक पवार, कार्याध्यक्ष डाॕ. किशोर उढाण, सचिव अशोक दामले, राजाराम मोरे, बाळासाहेब हरबक, साहेबराव म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

मध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी...

श्री. खैरे म्हणाले, की भीती न बाळगता यापुढे कोरोनासोबत जीवन जगावे लागणार आहे. लॉकडाउनमध्ये रोज एक हजार लोकांना जेवण दिले. क्वारंटाइन सेंटर दत्तक घेतले. ४४ हजार जप केला. यामुळे अमेरिकेसारखे झाले नाही. त्यावर डॉ. काळे यांनी चिमटे काढले. ते म्हणाले, की खैरे यांच्याकडे दैवी शक्ती आहे. त्यांनी कोरोना घालविण्यासाठी बाप्पाकडे प्रार्थना करावी! डॉ. कराडांनी दिल्लीहून शहरासाठी विकास निधी आणावा, असा सल्लाही काळे यांनी दिला. डॉ. कराड म्हणाले, की कोरोना होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. केंद्र आणि राज्य शासन एकजुटीने काम करीत आहेत. केंद्राच्या योजनांचा कॉंग्रेसने अभ्यास करणे गरजेचे आहे. श्री. सावे म्हणाले, की गणेशोत्सव सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरा करायचा आहे. नियमावली सर्वांनी काटेकोर पाळावी.

कोरोनामुळे शिक्षणात सावळा गोंधळ, विद्यार्थी अध्ययनापासून दूर

(संपादन - गणेश पिटेकर)

go to top