कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची फरफट थांबता थांबेना!!

Aurangabad Corona News
Aurangabad Corona News
Updated on

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची फरफट सुरूच आहे. वाळूज येथे पॉझिटिव्ह आलेल्या एकाला बुधवारी (दि.२४) उपचारासाठी चिकलठाणापर्यंत यावे लागले. त्यानंतर त्याला भरती करून न घेता घाटीत जाण्याचा सल्ला देण्यात आला. या प्रकाराने संतप्त होऊन त्याने गावाकडे अंबाजोगाईला जाण्याचा निर्णय घेतला. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मिडियावर आज व्हायरल झाला.


व्हिडिओत सदर तरुण सांगतो की, कंपनी कामगार असल्याने उपचारासाठी ते पंढरपूर ईएसआय रुग्णालयात गेलो. तिथून वाळूज रुग्णालयात पाठविण्यात आले. वाळूज रुग्णालयात खाटा शिल्लक नसल्याने चिकलठाणा येथील ईएसआयमध्ये जाण्याचा सल्ला दिला गेला. आपण दुचाकीवरून वाळूजपासून प्रवास करीत सकाळी ११ वाजता चिकलठाणा गाठले. मात्र, तिथे त्यांना ग्रामीणचा रुग्ण असल्याचे सांगत भरती करून घेण्यास नकार दिला गेला. जिल्हा रुग्णालय किंवा घाटीत जाण्याचा सल्ला देण्यात आला. तब्बल दोन-तीन तास प्रतीक्षा करुनही कुणीच प्रतिसाद दिला नाही.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kunbi certificate latest update Maharashtra
New Harsul Development
Children, Smartphones and Mental Health: Why Parents Need to Take Mobile Addiction Seriously
Chandgude Family Tragedy
Marathi News Esakal
www.esakal.com