दुचाकी घसरुन एक जण गंभीर जखमी ; कचनेर फाटा-पिंर्पीराजा रस्त्यावरील घटना

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 January 2021

अपघाताची माहिती मिळताच आडुळ येथील १०८ रुग्णवाहीकेचे डॉ. असलम सय्यद, चालक नासेर सय्यद यांनी जखमीला मदतकार्य करुन पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले.

आडुळ (औरंगाबाद) : रस्त्याच्या चौपदरी करणाचे काम सुरु असल्याने जागोजागी खोदण्यात आलेला रस्ता लक्षात आला नाही. त्यामुळे दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकी स्वार एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१) रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास कचनेर फाटा-पिंर्पीराजा रस्त्यावर घडली. जखमीचे निहालसिंग चैनसिंग सुलाणे असे नाव आहे.
 
हे ही वाचा : औरंगाबाद पोलिसांची धडक कारवाई! चिनी मांजा प्रकरणात आठ जणांवर गुन्हे दाखल 

निहालसिंग चैनसिंग सुलाणे (वय ४८ वर्षे), राहणार हौनोबाचीवाडी (ता.पैठण) हे दुचाकी क्रमांक एम एच २० ए एच ५१२१ ने शुक्रवारी साडे सात वाजेच्या सुमारास पिंप्रीराजा कडून कचनेर फाट्याकडे येत होते. दुचाकी कचनेर फाट्या जवळील संभाजी साखर कारखान्याजवळ येताच रस्त्याच्या चौपदरी करणाचे काम सुरु असल्याने यासाठी खांदलेल्या रस्त्याचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकी घसरुन ते खाली पडले. 

हे ही वाचा : Aurangabad: साखर विभागाच्या कार्यालयाला कुलूप लावण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना रोखलं

यात ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच आडुळ येथील १०८ रुग्णवाहीकेचे डॉ. असलम सय्यद, चालक नासेर सय्यद यांनी जखमीला मदतकार्य करुन पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One person was seriously injured when a two wheeler fell on Kachner Fata Pimpiraja Road in Adul on Friday