औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार कोटींचे पीककर्ज वाटप, दोन लाखावर सभासदांना लाभ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

खरीप हंगामासाठी औरंगाबाद जिल्ह्यात सर्व बँकानी पुढे येत शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात २ लाख ९ हजार ५७९ सभासदाना १ हजार ८४ कोटी ३६ लाख रुपयांची पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

औरंगाबाद : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सर्व बँकानी पुढे येत शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात २ लाख ९ हजार ५७९ सभासदाना १ हजार ८४ कोटी ३६ लाख रुपयांची पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. यातील बहुतांश बँकांनी उदिष्टापेक्षा जास्त कर्ज वाटप केल्याची माहीती लिड बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर यांनी दिली.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा बँक, सर्वजनिक बँकाबरोबर व्यापारी बँकांतर्फे कर्जवाटपात आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील कर्जवाटप मराठवाड्यातील सर्वाधिक वाटप असल्याचेही श्री. कारेगावकर म्हणाले. जिल्ह्यात बँकांतर्फे कोरोनाचा काळातही बँकांनी शेतकऱ्यांचा विचार खरिपासाठीचे कर्जवाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९०.६१ टक्के कर्जवाटप झाले आहे. कर्ज वाटपात यात सर्वाधिक जिल्हा बँकेने वाटप केले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३९६ कोटी.३४ लाखाचे पीक कर्ज वाटप केले आहे. यासह बँक ऑफ महाराष्ट्राने १६१ कोटी कर्ज वाटप केले असेही कारेगांवकर यांनी सांगितले.

आरोग्यासाठी बचत कशी कराल, त्यासाठी हे वाचायलाच हवे

बँकेचे नाव------------ कर्जवाटप--------------------------टक्केवारी
जिल्हा मध्यवर्ती बँक--- ३९६ कोटी.३४लाख ------------९६
व्यापारी बँका------------८७ कोटी --------------------------५९.
महाराष्ट्र ग्रामीण बँक-----१७४ कोटी४८ लाख------------१५३
बँक ऑफ महाराष्ट्र------१६१ कोटी ------------ -----------१३०
बँक ऑफ बडोदा------- ४९ कोटी रुपये--------------------११०
बँक ऑफ इंडिया-------- २८ कोटी १८ लाख---------------- १३९
एकूण-----------१०८४ कोटी ३६ लाख-------- ९०.६१--- २ लाख ९ हजार ५७९- सभासद

वैजापूर तालुक्यात पावसाने गाठली सरासरी, जलसाठा समाधानकारक
सतत अवर्षणग्रस्त असणाऱ्या वैजापूर  (जि.औरंगाबाद) तालुक्यात यंदा वरुणराजाने जून महिन्याच्या सुरवातीपासूनच दमदार बॅटिंग केल्याने पावसाने तीन महिन्यातच वार्षिक सरासरी गाठली. यामुळे तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पात समाधानकारक जलसंचय झाला आहे. शिवाय पावसाळा संपण्यास महिन्याभराचा अवधी शिल्लक असल्याने प्रकल्पांतील जलसाठ्यांत आणखीनही भर पडणार आहे.

आगामी काळात तालुक्यातील ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे काम कमी होणार असून रब्बी हंगामही जोमात राहणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारंगी मध्यम प्रकल्पातही पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरवात केली आहे. प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता १३.२९० दलघमी इतकी असून क्षमतेच्या १९.१९ टक्के म्हणजेच ४.००२ दलघमी इतका जलसंचय प्रकल्पात जमा झाला आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Thousand Crores Crop Loan Distributed Aurangabad News