ऑनलाइन शिक्षणाचा नवोदयच्या विद्यार्थ्यांवर ताण, मानसिक ओढताण होतेय

संदीप लांडगे
Sunday, 13 September 2020

केंद्र शासनाने नवोदय विद्यालय समिती अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील महाविद्यालयासाठी महिला व पुरुष अशा दोन समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. मात्र कोरोनानंतर ऑनलाइन शिक्षणाचा ताण विद्यार्थ्यांवर पडत असतानाही प्रत्यक्षात समुपदेशकांची मदत मिळत नसल्याने मुलांच्या मानसिक स्वास्थ्याची हेळसांड होत आहे.

औरंगाबाद : नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने नवोदय विद्यालय समिती अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील महाविद्यालयासाठी महिला व पुरुष अशा दोन समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. मात्र कोरोनानंतर ऑनलाइन शिक्षणाचा ताण विद्यार्थ्यांवर पडत असतानाही प्रत्यक्षात समुपदेशकांची मदत मिळत नसल्याने मुलांच्या मानसिक स्वास्थ्याची हेळसांड होत आहे.

शासनाने कान उपटताच प्रशासकांना जाग, औरंगाबाद महापालिकेत ३० अधिकाऱ्यांना पदोन्नती

केंद्र शासनाच्या नवोदय विद्यालयाकडून इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. त्यांच्यासाठी वसतिगृहाची व्यवस्था केलेली आहे; मात्र अनेक दिवस या मुलांना आपल्या घरी, पालकांना भेटता येत नाही, परिणामी त्यांच्यात उदासीनता वाढते. त्यामुळे देशभरातील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले होते.

मुलांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ऑक्टोबर २०१९ पासून केंद्रीय शिक्षण विभागाकडून देशभरात ११७५ समुपदेशकांची नियुक्ती केली. तर महाराष्ट्र, गुजरात, दीव-दमण, गोवा या एका विभागासाठी ८५ समुपदेशक घेण्यात आले होते. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यासाठी नवीन आहे. त्यातच कोरोना संसर्गने मुलांचे वेळोवेळी समुपदेशन करणे गरजेचे आहे. मात्र मुलांचे आरोग्याविषयी समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकाऐवजी मुख्याध्यापक, शिक्षकांची मदत घेतली जात आहे.

ग्राहकांनो तुमचे वीजबिल जास्तीचे आले, घाबरु नका ! खात्री करण्यासाठी वापरा ही...

उच्च दर्जाच्या मानसिक आरोग्याविषयी समुपदेशन करण्यासाठी आरसीआय (रियाबलेशन कौन्सिल ऑफ इंडिया) या संस्थेशी संलग्न किंवा मानसशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या व्यक्तीच समुपदेशक म्हणून काम करू शकते. मात्र, नवोदय विद्यालयात समुपदेशकाऐवजी शिक्षक, मुख्याध्यापकांची मदत घेतली जात आहे. हा प्रकार मुलांच्या मानसिक स्वास्थ्याशी खेळण्याचा असल्याचे स्पाचे अध्यक्ष डॉ. संदीप शिसोदे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

 

मुलांचे समुपदेशन करण्यासाठी केंद्रीय शिक्षण विभागाकडून आरोग्य सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु कोरोना तसेच शाळा बंदचे कारण सांगून या समुपदेशकांची सेवा थांबवण्यात आली आहे.
- एक समुपदेशक

मागील सहा महिन्यांपासून मुले शाळेविना घरी आहेत. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांचा मानसिक तणाव वाढला आहे. या सर्व गोष्टींमध्ये समुपदेशनाची नितांत आवश्यकता आहे.
मारोती कल्याणकर (पालक-शिक्षक समिती सदस्य, नांदेड)

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Education Not Well To Navoday Vidyalay's Students