मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात फक्त २०० जणांना प्रवेश

माधव इतबारे
Friday, 11 December 2020

या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त डाँ. निखिल गुप्ता यांनी संयुक्त पत्रकार घेऊन माहिती दिली.

औरंगाबाद: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी (ता. 12) 1680 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेसह चार प्रकल्पांच्या कामांचे भूमिपूजन होणार आहे. गरवारे स्टेडियमवर दुपारी एक वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी फक्त
२०० निमंत्रितांना प्रवेश दिला जाणार असल्याचे शुक्रवारी (ता.11) प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

शहरासाठी गतवर्षी शासनाने 1680 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यातील 1308 कोटी रुपयांची निविदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अंतिम केली आहे. त्यानुसार शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेसह 152 कोटींचे रस्ते, सफारी पार्क, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे.

वाचा सविस्तर: रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर निदर्शने

या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त डाँ. निखिल गुप्ता यांनी संयुक्त पत्रकार घेऊन माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात फक्त 200 निमंत्रितांना प्रवेश असेल. कार्यक्रमाला हजर राहणाऱ्या प्रत्येक अधिकार्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. प्रवेश देतांना तीन स्तरावर तपासणी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 200 people attended the CM Uddhav Thackeray programme