
रांजनगाव दांडगा येथील विवाहिता आयेशा शेखचा चार वर्षांपूर्वी शेख इरफान बूऱ्हाणसोबत लग्न झाले होते
पाचोड (औरंगाबाद): येथील 24 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. महिलेच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल होईपर्यंत दफनविधी केला नव्हता. त्यानंतर पाचोड पोलिसांनी विवाहितेने चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रांजनगाव दांडगा येथील विवाहिता आयेशा शेखचा चार वर्षांपूर्वी शेख इरफान बूऱ्हाणसोबत लग्न झाले होते. आयेशा पती इरफान समवेत कुटुंबातून विभक्त राहत होते. अलीया शेख ( वय तीन वर्षे) व तंजीला शेख( वय तीन महीने) ही दोन अपत्ये होती. मंगळवारी (ता. दोन ) दिवसभर पती -पत्नी घरकाम करून सायंकाळी झोपी गेले. तत्पूर्वी पती -पत्नीत किरकोळ बाचाबाची झाल्याचे समजते.
शिवसेना नेते खैरेंच्या अंगावर मनसेने फेकली पत्रके, संभाजीनगर नामकरणावर आक्रमक
वादाचा राग अनावर झाल्याने पती व अन्य कुटूंबीय बाहेरगावी गेल्याचे पाहुन ती कुणाला काही एक न सांगता बुधवारी ( ता. तीन) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दोन्ही मुलींना सोबत घेऊन शेतात गेली. तिने पायातील चप्पल व अंगावरील ओढणी विहीरीच्या काठावर ठेवून दोन्ही मुलींना सोबत घेऊन विहीरीत उडी घेतली. दीड -दोन तासांनतर शेजारील महिला पाणी पिण्यासाठी विहीरीवर गेली असता तीला विहीरीच्या काठावर चप्पल व ओढणी दिसल्याने त्या महिलेनी विहीरीत डोकावून पाहीले असता तीन महिन्यांची तान्हुली कु. तंजीला चा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले.
तातडीने गावात येऊन या घटनेचा कुटुंबियांसह ग्रामस्थांना माहिती दिली. ही माहिती मिळताच ग्रामस्थ, नातेवाईक व पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, जमादार गोरक्षनाथ कणसे, निवृत्ती मदने, पवन चव्हाण आदीनी घटनास्थळी धाव घेवून चिमुकली तंजीलाचा मृतदेह बाहेर काढला, मात्र उर्वरित मायलेकीचा गावांतील सर्व पोहणाऱ्यानी तळाशी बुडया घेऊन शोध घेतला, रात्र झाली तरी मृतदेह सापडत नसल्याने हर्षी ( ता.पैठण) येथील जलतरणपटु कृष्णा आगळे यांस बोलविण्यात आले.
मोक्कातील तिघा कैद्यांचे बनावट जामीनपत्र हर्सूल कारागृहाच्या पेटीत, गुन्हा दाखल
रात्री साडेआठ वाजता आयेशा व अलीया या मायलेकीचे मृतदेह सापडून आले. तिघींचे मृतदेह पाचोड पोलिसोनी खासगी वाहनाद्वारे उत्तरणीय तपासणीसाठी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असुन आपल्या आत्महत्येनंतर आपली चिमुकली मुलींचे काय होणार ? म्हणून आई आयेशा हिने आपल्या सोबत 'त्या' निष्पापाचाही 'बळी' हे ऐकून उपस्थितीनाही अश्रू आवरता आले नाही.
'तुमची अजाण तर आमचे शिवगान', भाजपचा शिवसेनेवर निशाणा
पाचोड पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून तुर्तास या घटनेची नोंद केली होती. याबद्दलचा तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, जमादार गोरक्षनाथ कणसे, निवृत्ती मदने करीत होते.
(edited by- pramod sarawale)