कोरोना होऊन गेलाय आणि ठणठणीत बरं व्हायचंय तर मग 'असा' घ्या आहार

post corona diet
post corona diet

औरंगाबाद: कोरोना होऊ नये यासाठी आवश्‍यक खबरदारी घेणे हा एक पर्याय आहे. कोरोना होऊन गेल्यानंतरही अशक्तपणा जाणवतो, चालल्यावर थकून जायला होते. यासाठी कोरोनातून बरे झाले तरी त्यातून पूर्णपणे सावरून ठणठणीत होण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे बनले आहे. चहा पीत असाल तर चहा करण्याच्या पद्धतीत बदल करावा लागणार आहे. हळद दूध घ्यावे लागणार आहे. प्रोटिन्स मिळवण्यासाठी अंडी खावी लागणार आहेत.

चाळीशीनंतर आहारात बदल करणे गरजेचे आहे कारण चाळीशीनंतर पचनक्रियेत बदल होत असतो. यामुळे आहार चाळीशीपूर्वीप्रमाणेच राहिला तर त्यामुळे वजन वाढते. मग वाढणारे वजन कमी करण्यासाठी सुरू होते डायटींग. डायटींगच्या नावाने अनेकजण जेवण कमी करतात त्यातून वजन कमी होण्यापेक्षा अशक्तपणा वाढण्यातच भर पडते. त्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर अशक्तपणा आणखी वाढत आहे.

गेल्या वीस वर्षांहून अधिक काळापासून अनेक नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंच्या डाएटीशियन म्हणून मार्गदर्शन करणाऱ्या व नाशिकच्या पंचवटी केटरर्स कॉलेजच्या प्रा. कुंदा महाजन यांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर पूर्ववत ठणठणीत होण्यासाठी योग्य आहार गरजेचा असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या सर्वसाधारण लोकांचा आणि कोरोनातून बरे झालेल्यांसाठीच्या आहारामध्ये थोडाफार बदल आहे. साधारणतः: चाळीशीनंतर चयापचयाची गती कमी होते व त्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो. चाळीशीनंतर वजन वाढायला लागल्यानंतर अनेकजण आहार कमी करतात मात्र यामुळे अशक्तपणा येतो तसे करू नये. दिवसातून एखादे तरी फळ खावे. बहुतांश घरात एखादे फळ असेल तर ते कापून चार फोडी केल्या जातात आणि चारजण खातात. त्यांमुळे किमान दोन फोडी तरी खाल्ल्या पाहिजेत.

अनेकजण सकाळी काही न खाता एकदम जेवण करतात. तोपर्यंत चहा पीत राहतात तसे न करता, सकाळी न्याहरी करावी. दुपारी १ वाजता जेवण, सायंकाळी चहा किंवा एखादे फळ खावे आणि रात्री ८ पुर्वी जेवण केले पाहिजे. मात्र असे करणे कामाच्या वेळांमुळे प्रत्येकांना शक्य होत नसले तरी चाळीशीनंतर रूटीनमध्ये थोडाफार बदल केला पाहिजे. आहारात नेहमी कंप्लिट डाएट पाहिजे. कडधान्य (भाकरी, पोळी, शेवया), एक भाजी, एक दाळ (पनीर किंवा मोड आलेले कडधान्य). मांसाहार घेणारे मांसाहाराचेही सेवन करू शकतात. एकूण सगळीच पोषक तत्त्व असणारा आहार घेतला पाहिजे. एक फुलके , वाटीभर दाळ, वाटीभर भाजी असा आहार घेतला तर वजनही वाढणार नाही आणि शरीराला सर्व पोषक तत्वही मिळतील असे प्रा. महाजन म्हणाल्या.

कोरोना होऊन गेल्यानंतर घ्या असा आहार 
कोरोना होऊन गेल्यानंतरचा आहार कसा असावा याविषयी डाएटेशियन कुंदा महाजन यांनी दिलेल्या टिप्सनुसार सकाळी चवनप्राश, आवळा शरबत, आवळा कॅंडी यापैकी काहीतरी घ्यावे. तसेच एखादे संत्रे किंवा किवी फळ खावे यामुळे इन्फेक्शन नियंत्रित करण्यासाठी मदत होते. शिवाय सकाळी सी व्हिटॅमीन पोटात जाईल. आजारातून उठल्यामुळे एकदम जेवण जात नाही यासाठी जेवण थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे घ्यावे.

१. मसाल्याने ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो यामुळे आहारात मसाल्याचा कमी वापर करावा. जेवणात गरम पाण्याचा वापर करावा. 
२. हळद दूध प्यावे. हळद ,दूध आणि पाण्याचे मिश्रण उकळून घेऊन हळद दूध करावे. ज्यांना हळद दुधामुळे कफ होतो असे वाटत असेल तर त्यांनी कोमट पाण्याबरोबर हळद पिलं तरी चालते. 

३. कोरोनातुन बरे झाल्यानंतर येणाऱ्या अशक्तपणामुळे काहींना पचनाला त्रास होतो अशावेळी आपल्याला आवडत नसल्या तरी गिलके, दोडके,भोपळा,पडवळ अशा भाज्यांचा पोटाला त्रास न होणाऱ्या भाज्यांचा आहारात वापर करावा. तसेच डाळीत मुग दाळ,मठ दाळ, मसूर डाळीचाही आहारात वापर करावा याचा त्रास होत नाही. 
४. ज्यांना चहा घेण्याची सवय आहे, त्यांनी चहा घेणे कमी करावे. जरी चहा घेतला तरी त्यात गवती चहा, अद्रक आणि एखादा मिरं टाकावा. चहा करताना नेहमीसाठी जरी असले तरी त्यात दूध टाकून उकळू नये. त्याऐवजी चहा गाळल्यानंतर वरून दूध टाकावे. 
५. आहारात प्रोटीन्स असणे अतिशय महत्त्वाचे आहे. अंडी हा प्रोटीन्सचा उत्तम स्रोत आहे यामुळे जे अंडी खातात त्यांनी अंडी खावीत. सध्या बर्ड फ्लूच्या भीतीने अंडी खाणे अनेकांनी सोडले असले तरी अंडी शंभर डिग्री सेल्सिअस तापमानात उकळली जात असल्याने अंडी खाण्याला काहीच अडचण नाही. तथापि अंडी नको वाटत असतील तर वरण खावे मात्र ते पातळ नको घट्ट असले पाहिजे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com