प्रकाश आंबेडकरांसाठी आमची दारे सदैव खुली

शेखलाल शेख
Sunday, 5 January 2020

प्रकाश आंबेडकरांसाठी आमची दारे सदैव खुली राहतील. ते मोठे नेते असून त्यांचा आमच्या मनात नेहमी आदर आहे. भविष्यात सुद्धा ते आमच्या सोबत येतील अशी अपेक्षा आहे. असे ऑल इंडीया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे नवनियुक्ती प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी औरंगाबादेत म्हणाले. 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत एमआयएमची आघाडी झाली नाही हे चांगले झाले नाही. मात्र प्रकाश आंबेडकरांसाठी आमची दारे सदैव खुली राहतील. ते मोठे नेते असून त्यांचा आमच्या मनात नेहमी आदर आहे. भविष्यात सुद्धा ते आमच्या सोबत येतील अशी अपेक्षा आहे. असे ऑल इंडीया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे नवनियुक्ती प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी औरंगाबादेत म्हणाले. 

कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर डॉ. कादरी यांनी रविवारी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत वंचित सोबत आघाडी झाली नाही त्याची खंत आहे. मात्र आम्ही आता नव्याने आमच्या पक्षाची बांधणी करत आहोत. राज्यात पक्षाला मजबुत करण्याचा प्रयत्न राहिल.

हेही वाचा : ..तरिही अब्दुल सत्तार यांच्याकडे महसूल, ग्रामविकास  

एमआयएमच्या राज्यातील सर्व कार्यकारणी बरखास्त 

वंचित आघाडी सोबत बोलणी फिस्कटल्यानंतर तसेच विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर एमआयएमने मुंबई वगळता राज्यातील सर्व कार्यकारणी रद्द केल्या आहेत. आता पुढील महिनाभरात नवीन संघटन तयार करुन जिल्हा, तालुका स्तरावर कार्यकारणी गठीत केल्या जाणार आहे. यामध्ये एससी, एसटी, ओबीसी समाजाच्या नवीन-जुन्या असा सर्वच जणांना संधी देण्यात येणार आहे. लकरच राज्यभर दौरे करुन पक्षाच्या जिल्हास्तरावर नवीन कार्यकारणी निवडल्या जाणार आहे. 

नगरसेवकांवर कारवाई 

एमआयएमने औरंगाबाद महापालिका उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या विरुद्ध जाऊन मतदान करणाऱ्या सहा नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती. पक्षापेक्षा कुणीच मोठा नसून शिस्त न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. पक्षापेक्षा कुणीच मोठा नाही.

उपमहापौर पदाच्या निवडणुकीत आमच्या एका सदस्याने तर चक्क शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे औरंगाबादेतील नगरसेवकांवरील कारवाई योग्य आहे. त्यांनी माफीनामा दिला किंवा योग्य असे कारण दिले तर त्यांच्याबद्दल पक्ष विचार करेल असे कादरी म्हणाले.

हेही वाचा : हप्तेखोरी, अतिक्रमणांनी घोटला फुटपाथचा गळा

औरंगाबादेत लढणार 70 ते 75 जागा 

औरंगाबाद महापालिका निवडणुकी ही एप्रिल 2020 मध्ये होण्याची शक्‍यता आहे. आता वॉर्डनिहाय निवडणुका होणार असल्याने त्याचा आम्हाला फायदा असून 115 जागांपैकी आम्ही 70 ते 75 जागांवर उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ. गफ्फार कादरी म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar Gaffar Qadri Mim Vanchit Aghadi news

टॉपिकस