खड्ड्यात नारळ फोडून लावले बेशरमाचे झाड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

मागील काही वर्षापासून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून वाहन चालविणे अवघड झाले आहे. विशेष म्हणजे हा रस्ता येथून पुढे कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांच्या गावाकडे जातो.

औरंगाबाद : पैठण तालुक्‍यातील पोरगाव फाटा ते टेकडी तांडा या दोन किलोमीटर रस्त्याचे काम मागील दोन वर्षापासून रखडले आहे. कुणीच जुमानत नसल्याने ऑल इंडीया बंजारा सेवा संघ व गावकऱ्यांनी रस्त्यांमधील खड्ड्यात नारळ फोडून बेशरमाचे झाड लावून निषेध केला. 

मागील काही वर्षापासून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून वाहन चालविणे अवघड झाले आहे. विशेष म्हणजे हा रस्ता येथून पुढे कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांच्या गावाकडे जातो. या शिवाय या रस्त्याने गावकऱ्यांना सहकारी बॅंक, चार जिनिंग, पोलिस ठाणे, तहसिल कार्यालय, बाजार अशा कामासाठी जातांना कसरत करावी लागते.

हेही वाचा : आज उपोषण, उद्या रस्त्यावर उतरू : देवेंद्र फडणवीस

या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे नाहीतर 2 फेब्रुवारी रोजी या रस्त्यांच्या रखडलेल्या जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध मुंडन आंदोलन करुन प्रतिकात्मक अंत्यविधी करुन आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

क्लिक करा : आम्ही केलेल्या कामाला वेग द्यावा, म्हणून उपोषण - पंकजा मुंडे

यावेळी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अविनाश जाधव, राहुल राठोड, सचिन पवार, विनोद आढे, अक्षय चव्हाण, अमोल जाधव, रामेश्‍वर चव्हाण, विनोद जाधव, गोकुळ चव्हाण, आदित्य चव्हाण, अजय पवार, राम जाधव, अमोल राठोड, अर्जुन राठोड यांची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road Condition Andolan Paithan Aurangabad News