
सध्या सोशल मिडीयावर डी मार्ट शॉपिंग गिफ्ट व्हाऊचरची फेक लिंक व्हायरल होत आहे.
औरंगाबाद: सध्या सोशल मिडीयावर डी मार्ट शॉपिंग गिफ्ट व्हाऊचरची फेक लिंक व्हायरल होत आहे. यावर क्लिक करुन माहिती भरत जाल तर आर्थिक फसवणूक होऊ शकते, त्यामुळे अशा लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे संबंधित लिंकवर क्लिक केल्यानंतर डी मार्टचा लोगो ओपन होतो, त्यामुळे ग्राहकांचाही विश्वास बसतो, भामट्यांनी त्यामुळे हा फंडा निवडल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
बहूतांश नागरिक ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात. डी मार्टसारख्या कंपन्याकडून बहूतांश वेळा ऑफर्स येतात, त्यामुळे फेक लिंकच्या जाळ्यात अडकण्यास सोपे जाते, याबाबत श्री. वानखेडे यांनी कळविले आहे की, https://myvip-1.xyz/dmart/#1612533042953 ही लिंक सध्या सोशल मिडायावर धुमाकूळ घालत आहे. याद्वारे दहा हजार रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर देण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.
पंकजांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, 'चांगला विकास करा', धनंजय...
ती ओपन केल्यानंतर डी मार्टचे सिम्बॉल (लोगो) दिसतो. त्यामध्ये Spin हा गेम खेळण्याचे सांगितले जाते, यातून दहा हजार रुपयांचे व्हाऊचर लागल्याचे सांगून फसवणूक केली जात असून त्यावर आपली कोणतीही वयक्तिक माहिती भरु नये, अशा प्रकारापासून सावध रहा असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
(edited by- pramod sarawale)