जेष्ठ नागरीकांनो अशी घ्या काळजी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 March 2020

आरोग्य मंत्रालयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना 

औरंगाबाद : जागतिक पातळीवर कोरोनाचा गंभीर परिमाण झाला आहे. सातत्याने त्याचे प्रभावक्षेत्र वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी घरातच राहणे योग्य आहे. शारीरिक मर्यादा, रोग प्रतिकारशक्ती कमी असणे, तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचा आणि फुफ्फुसाचा जुनाट आजार या सारख्या विविध व्याधींमुळे वयोवृद्ध लोकांमधे कोविड -१९ चा संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यामुळे जेष्ठ नागरीकांसह सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय आवश्‍यक आहे. 

अशी घ्या काळजी 

- घरी रहा. घरी आलेल्या अभ्यागतांना भेटणे टाळा. जर भेटणे आवश्यक असल्यास, किमान एक मीटर तर राखून भेटावे. 
- यमित अंतराने आपले हात आणि चेहरा साबणाने आणि पाण्याने धुवावा. 
- कताना किंवा खोकताना आपल्या हाताच्या कोपर्याचा किंवा टिशू पेपर / रुमाल याचा वापर करा. 
- कला किंवा शिंकल्यानंतर टिश्यू पेपरची विल्हेवाट लावावी, हातरुमाल धुवून घ्या. 
- ग्य पोषण आहारासाठी घरी शिजवलेले ताजे गरम जेवण करावे. सतत पाणी प्यावे, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ताजे फळांचे रस घ्यावे. 
- व्याम आणि ध्यान करावे 
- डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे नियमितपणे घ्यावीत. 
- आपल्या कुटुंबातील सदस्यांशी (तुमच्याबरोबर राहत नसलेल्या), नातेवाईक आणि मित्रांशी कॉलद्वारे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बोलावे, आवश्यक असल्यास कुटुंबातील सदस्यांची मदत घ्यावी. 
- तीबिंदू शस्त्रक्रिया किंवा गुडघा बद्दलण्यासारख्या आपल्या शस्त्रक्रिया करणे (नियोजित असल्यास) पुढे ढकलावे. 
- आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. आपल्याला ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तत्काळ जवळच्या आरोग्य सेवा सुविधेशी संपर्क साधावा आणि वैद्यकीय सल्ल्याचे अनुसरण करावे 
- आपल्या उघड्या हातात किंवा आपला चेहरा झाकल्याशिवाय खोकु किंवा शिंकू नका 
- जर आपल्याला ताप आणि खोकला येत असेल तर आपल्या संपर्कातील लोकांजवळ जाऊ नका 
- आपल्या डोळे, चेहरा, नाक आणि जिभेला स्पर्श करु नका 
- स्वत: च्या मनाने औषधोपचार करू नका 
- आपल्या मित्रांना आणि जवळच्या लोकांसोबत हस्तांदोलन करू नका अथवा आलिंगन देऊ नका 
- नियमित तपासणीसाठी किंवा पुर्नतपासणी करण्यासाठी रुग्णालयात जाऊ नका. शक्यतो आपल्या आरोग्य सेवा प्रदात्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून मार्गदर्शन घ्या. 
- उद्याने, बाजारपेठ आणि धार्मिक स्थळांसारख्या गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका 
- अत्यंत आवश्यक नसल्यास बाहेर जाऊ नका. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior Citizen Instructions Health Ministry Aurangabad News