esakal | वीजेचा शॉक लागून २६ मेंढ्यांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

वीजेचा शॉक लागून २६ मेंढ्यांचा मृत्यू 

मेंढपाळ वाळीराम किसन सागरे यांच्या तब्बल साठ मेंढ्या शेतात बांधलेल्या होत्या. त्यावेळेस वीजेच्या तारा तुटल्या या तारांचा शॉक लागल्याने २६ मेंढ्याचा मृत्यु झाला आहे. 

वीजेचा शॉक लागून २६ मेंढ्यांचा मृत्यू 

sakal_logo
By
अविनाश संगेकर

लासूर स्टेशन जि. औरंगाबादः वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका मेंढापाळांना बसला आहे. रायपूर (ता.गंगापूर) येथे वाऱ्याने वीज तारा तुटल्याने शॉक लागून तब्बल सव्वीस मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. 
मेंढपाळ वाळीराम किसन सागरे यांच्या तब्बल साठ मेंढ्या शेतात बांधलेल्या होत्या. त्यावेळेस वीजेच्या तारा तुटल्या या तारांचा शॉक लागल्याने २६ मेंढ्याचा मृत्यु झाला आहे.

ही घटना गुरुवारी (ता.चार) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.अंदाजे तीन लाख नव्वद हजारांच्या या मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. मेंढ्यांवरच उर्दनिर्वाह असल्याने श्री. सागरे यांचे मोठे नुकसान झाले. तलाठी के. आर .घुगे यांनी पंचनामा केला आहे.

शासनाने श्री.सागरे याना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी पंचायत पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर आहेर, संदीप शेलार, योगेश घिटरे, नवनाथ घिटरे यांनी केली आहे. यावेळी पोलीस पाटील बाबासाहेब जाधव, सरपंच चंद्रकला कीर्तिकर, ग्रामसेवक जाधव, महावितरणचे अभियंता सोमवंशी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उबाळे यांनी पाहणी केली.