esakal | मंदिर उघडण्यावरुन शिवसेना एमआयएम आमने-सामने, आंदोलन मागे
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena-MIM

औरंगाबादचे ग्रामदैवत असलेल्या खडकेश्वर मंदिर उघडण्यात यावे याबाबत एमआयएम पक्षाच्या वतीने मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देण्यात येणार होते. मंगळवारी (ता.एक) दुपारी दोन वाजता खासदार इम्तियाज जलील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंदिरासमोर जमणार होते.

मंदिर उघडण्यावरुन शिवसेना एमआयएम आमने-सामने, आंदोलन मागे

sakal_logo
By
प्रताप अवचार

औरंगाबाद : औरंगाबादचे ग्रामदैवत असलेल्या खडकेश्वर मंदिर उघडण्यात यावे याबाबत एमआयएम पक्षाच्या वतीने मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देण्यात येणार होते. मंगळवारी (ता.एक) दुपारी दोन वाजता खासदार इम्तियाज जलील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंदिरासमोर जमणार होते. मात्र याला शिवसेनेकडून विरोध करण्यात आला. हिंदूंचे मंदिर उघडण्यास हिंदू समर्थ आहेत, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.


राज्यातील मंदिर-मशिद उघडण्यात यावे, अशी मागणी करीत एमआयएमने तीव्र आंदोलन हाती घेतले आहे. ठरल्याप्रमाणे मंगळवारी दुपारी दोन वाजता एमआयएम पदाधिकारी खडकेश्वर येथे घटनास्थळी आले. मात्र, त्याला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी मंदिराच्या आवारात होते. त्यामुळे मंदिराच्या आवारात काही काळ गोंधळ तर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जोरदार घोषणा बाजी सुरू झाली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत एमआयएम कार्यकर्त्यांना निघून जाण्यास सांगितले. या वेळी संपूर्ण परिसर महादेवाच्या जयघोषाने निनादुन गेला.

एमआयएमचे मंदिर प्रेम एक स्टंटबाजी : आ. अंबादास दानवे यांनी साधला निशाना

माजी खासदार खैरे यांची एमआयएमवर टीका
खासदार इम्तियाज जलील हे देवाच्या नावावर राजकारण करू पाहत आहे. हिंदूंचे मंदिर शासनाच्या नियमानुसार खुले होईल. कोणी ही येऊन आमचे मंदिर खुले करायला ती खासगी मालमत्ता नाही. आम्ही हिंदू अजून सक्षम आहोत, असे माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले. यावेळी जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांची उपस्थिती होती.

मनसेची उडी
खडकेश्वर मंदिराच्या आवारात हा गोंधळ सुरू असताना मनसेचे सुहास दशराथे आणि पदाधिकाऱ्यांनी उडी घेतली. घोषणा बाजी करीत त्यांनी एमआयएमसह शिवसेनेवर देखील टीका केली.

(संपादन- गणेश पिटेकर)