esakal | गुलाबी थंडीत तापणार गावगाड्याचे राजकारण, गावागावात वाढणार चुरस
sakal

बोलून बातमी शोधा

sillod.

ग्रामपंचायत निवडणूकीचे वारे वाहू लागले असतांना, गावगाड्याचे राजकारण गुलाबी थंडीत चांगलेच तापणार आहे

गुलाबी थंडीत तापणार गावगाड्याचे राजकारण, गावागावात वाढणार चुरस

sakal_logo
By
सचिन चोबे

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : ग्रामपंचायत निवडणूकीचे वारे वाहू लागले असतांना, गावगाड्याचे राजकारण गुलाबी थंडीत चांगलेच तापणार आहे. तालूक्यात मुदत संपलेल्या 83 ग्रामपंचातींसाठी 15 जानेवारीस मतदान होत आहे. त्या अनुषंगाने निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या गावपुढाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत.

निवडणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे गावागावात तरूणांचा गावगाड्याच्या राजकारणात उतरण्याकडे कल वाढला असल्याचे चित्र आहे. गावागावात गटातटाचे राजकारण कायम बघावयास मिळते. मागील निवडणूकांचा आढावा बघता तालूक्यातील ग्रामपंचायतींमध्ये कायम ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापित पुढाऱ्यांना धक्का देण्यासाठी बहूतांश गावांमध्ये युवा पिढी पॅनेल उभे करण्यासाठी कसरत करू लागली आहे. यामुळे गावगाडा हाकणाऱ्या जुन्या पदाधिकाऱ्यांना यावेळेची निवडणूक म्हणजे राजकारण कायम ठेवायचे असेल तर त्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

यंदा घरीच साजरा होणार थर्टी फर्स्ट, रात्रीच्या संचारबंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांना फटका

सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे तरूणाई मात्र प्रचारासाठी याचा पुरेपुर उपयोग करून घेणार आहे. सोमवारनंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. गेल्या दोन दिवसांत केवळ 19 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

शिक्षणाची अट शिथिल- ग्रामपंचायतीच्या राजकारणात उतरण्यासाठी सदस्यांचे शिक्षण सातवीपर्यंत असणे बंधनकारक आहे. 1995 नंतरचा जन्म झाला असलेल्या उमेदवारांसाठी हि अट बंधनकारक असून, 1995 च्या अगोदर जन्म झाला असलेल्या इच्छूक उमेदवारासांठी मात्र शिक्षणाची अट बंधनकारक नाही.

(edited by- pramod sarawale)