अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप अधांतरीच, अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान

संदीप लांडगे
Sunday, 25 October 2020

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करा, अशी मागणी प्राचार्यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

औरंगाबाद : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करा, अशी मागणी प्राचार्यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडल्याने ऑनलाइन तासिका सुरू करता येत नाहीत. त्यात पाहिले सत्र संपत आले तरी प्रवेश नाहीत, अशावेळी अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार, असा प्रश्न प्राचार्यांना पडला आहे.
राज्यातील ऑनलाइन अकरावीची प्रवेश प्रक्रिया ता.१० सप्टेंबरपासून थांबलेली आहे. प्रवेश प्रक्रियेत पहिली फेरी संपली असून दुसरी फेरी सुरू असतानाच प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आली.

प्रशांत अमृतकर प्रकरणी कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा मंडळाचे संचालकांना नोटीस

एसईबीसी आरक्षणा बाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षण विभागाने प्रक्रिया थांबवली आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या सूचना आल्यानंतर प्रक्रिया सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. एक महिना झाला तरी राज्य सरकारने कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने अद्यापही प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. त्यात पहिली फेरी प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी सुरू करण्यात महाविद्यालयांना अडचणी आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू करायचे की नाही. याबाबतही शिक्षण विभागाकडून कोणत्याही सूचना नाही.

त्यात दुसरी फेरीनंतर प्रवेशित विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पुन्हा नव्याने सुरू करावा लागेल. त्यामुळे महाविद्यालयांनी अकरावीची ऑनलाइन वर्ग सुरू केलेले नाहीत. थांबलेली ही अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी आता प्राचार्यांनी शिक्षण विभागाकडे ऑनलाईन केली आहे. औरंगाबाद शहरातील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन मागणी नोंदवित प्रवेश प्रक्रिया सुरु करावी असे म्हटले आहे. थांबलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडेही शिक्षण विभागाचे लक्ष वेधले आहे.

अडचणी, सूचना असतील तर थेट संपर्क करा; औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांची नागरिकांना आवाहन

अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान
करिअरच्या दृष्टिकोनातून अकरावी, बारावी हे दोन वर्ष महत्त्वाचे असतात. त्यात करोनामुळे प्रकिया आधीच लांबली आहे. त्यात प्रवेश प्रकिया रखडल्याने अभ्यासक्रम ऑनलाइन सुरू झालेला नाही. अकरावीचा अभ्यासक्रम शिकवून बारावी तयारीची प्रकिया सुरू होते. दिवाळीनंतर वर्ग सुरू झाले तर कमी कालावधी मिळेल. त्यात अभ्यासक्रम पूर्ण करणे आव्हान असणार आहे.

संपादन- गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Still Now Eleventh Standard Admission Process Incomplete Aurangabad