esakal | आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Zilha Parishad Meeting

जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातून ३६ शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे आले होते. त्यातून प्राथमिक, माध्यमिक व विषेश शिक्षक गटातील पुरस्कारासाठी निवड समितीची बैठक जिल्हा परिषदेत पार पडली.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव

sakal_logo
By
दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातून ३६ शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे आले होते. त्यातून प्राथमिक, माध्यमिक व विषेश शिक्षक गटातील पुरस्कारासाठी निवड समितीची बैठक जिल्हा परिषदेत पार पडली. यात तीन शिक्षकांची निवड करण्यात आली असुन शिक्षक दिनी पुरस्कार जाहीर करणार असल्याची माहीती शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी दिली.

वाल्मीने शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोचवावे, मृदा व जलसंधारण मंत्र्यांचे निर्देश


जिल्हा परिषद व निवड समितीच्या अध्यक्ष मिना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, सिईओंचे प्रतिनीधी म्हणून अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, शिक्षण सभापती गलांडे, महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा चव्हाण, समाज कल्याण सभापती मोनाली राठोड, शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, शासकीय डिएड कालजे प्राचार्य संजिवनी मुळे, सदस्य सचिव शिक्षण अधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल, उप शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांची उपस्थिती होती.


जिल्हा परिषदेतर्फे प्रतिवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी यावेळी जिल्ह्यातून एकुण ३५ शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. दरम्यान बहुमानाचा समजला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्याला मिळावा यासाठी इच्छुक शिक्षकांनी मंत्री,आमदार तसेच ज़िल्हा परिषदेचे विविध विषय समितीचे सभापती यांच्या शिफारशी करण्यात आल्यामुळे फक्त ३ शिक्षकांची निवड कशी करावी असा पेच पदाधिकारी आणि प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.


जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण पुरस्कार दिला जातो. यात प्राथमिक, माध्यमिक, व विशेष शिक्षक अशा तीन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. दरम्यान यंदा पाच सप्टेंबरला चार दिवस शिल्लक राहिले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या आखेरीस ३६ प्रस्ताव शिक्षण विभागाकडे दाखल झाले आहेत. दरम्यान नऊ तालुक्यातील प्राथमिक १६, माध्यमिक १५ व विशेष शिक्षक ४ असे एकुण ३६ शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झाले असल्याची माहिती शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी दिली.

प्राथमिक शिक्षकांची संख्या जास्त असल्याने २ पुरस्कार द्यावेत : मधुकर वालतुरे
जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षकांच्या तुलनेत प्राथमिक शिक्षकांची संख्या मोठी असल्याने प्रशासनाने प्राथमिक शिक्षकांना २ आदर्श शिक्षक पुरस्कार द्यावेत असे जिल्हा परिषद सदस्य तथा स्थायी समितीचे सदस्य मधुकर वालतुरे यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षकांची संख्या ९ हजार ५०० असूनही केवळ एका शिक्षकाची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करणे सयुंक्तिक नाही असेही वालतुरे यांनी सांगितले. आगामी स्थायी समितीच्या बैठकीत आपण या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वाढणार असल्याचेहि वालतुरे यांनी "सकाळ" शी बोलतांना सांगितले.  

(संपादन - गणेश पिटेकर)

go to top