ट्रक पलटी, 40 शेळ्या मृत्युमुखी

ट्रक पलटी, 40 शेळ्या मृत्युमुखी

वैजापूर (जि.औरंगाबाद) : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर गारज व रंगारी देवगाव येथील खडकी पुलावर सुरत-अहमदाबादहून जालन्याकडे शेळ्या घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. 

माल वाहतुक करणाऱ्या ट्रक चालकास डुलकी लागल्याने चालकाचा ट्रकवरील ताब सुटून हा ट्रक दहा ते पंधरा फुट खोल नाल्यात पडला. या अपघात जवळपास 40 शेळ्यांचा मृत्यु झाला. जखमी झालेल्या शेळ्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.

ट्रकमधील पाच व्यक्ती सुद्धा जखमी झाले आहे. त्यांच्यावर सुद्धा उपचार करण्यात आले. 
याबाबत मिळालेल्यान माहितीनुसार माल वाहतूक ट्रक क्रमांक जीजे-31-टी- 1983 हा ट्रक सुरत अहमदाबादहुन जालन्याकडे शेळ्या घेऊन जात हेता.

यामध्ये जवळपास 170 शेळ्या होत्या. चालकाला डुलकी लागल्याने त्याचा ट्रकवरुन ताब सुटला होता. ट्रक पलटी झाल्याने रस्त्याचे कठडे तोडून हा ट्रक नाल्यात पडला. यामध्ये 40 शेळ्या मृत झाल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com