औरंगाबादेत आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

मनोज साखरे
Wednesday, 22 April 2020

हे दोन्ही नवीन रुग्ण समता नगर येथीलअसून एक  52 पुरुष व दुसरा 25 तरुण आहेत. त्यामुळे आता समता नगर येथील संख्या पाचवर गेली आहे. हा भाग आता हॉटस्पॉट ठरला आहे. 

औरंगाबाद : औरंगाबादेतील कोविड 19 चा संसर्ग झालेल्या दोन नवीन रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे दोन्ही रुग्ण समतानगर येथील असून, काच आणि फर्निचरचे काम करणाऱ्या 38 वर्षीय कोरोनाबाधित कारागिराच्या संपर्कात आले होते. 

त्यामुळे या आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 38 झाली असून, प्रत्यक्षात 18 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 38 पैकी पाच जणांचा   मृत्यू झाला, तर 15 रुग्ण बरे झाले आहेत. यातील एक घाटी रुग्णालय, पंधरा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. समतानगर येथे आढळून आलेल्या या दोन पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचेही ते म्हणाले. 

हे दोन्ही नवीन रुग्ण समता नगर येथीलअसून एक  52 पुरुष व दुसरा 25 तरुण आहेत. त्यामुळे आता समता नगर येथील संख्या पाचवर गेली आहे. हा भाग आता हॉटस्पॉट ठरला आहे. 

औरंगाबादेत पाचवा बळी, रुग्णसंख्याही वाढली

समतानगरात काच व फर्निचर काम  करणारा 38 वर्षीय कारागीर सर्वप्रथम कोरोनाबाधित झाला होता. त्याच्या संपर्कात आल्याने येथीलच 18 वर्षीय आणि 20 वर्षीय तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. आता आणखी दोघांना लागण झाल्याचे चाचणी अहवालानंतर स्पष्ट झाले. आता या भागातील रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. 

औरंगाबाद कोरोना मीटर 

  • एकूण रुग्णसंख्या -38
  • कोरोनामुळे मृत्यू - 05
  • उपचार घेत असलेले -18 रुग्ण
  • बरे होऊन घरी गेलेले रुग्ण -15

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two More Corona Positive In Aurangabad Total 38 Now