Youth Save Lives Of Sheeps
Youth Save Lives Of Sheeps

दोन हजार मेंढ्या बचावल्या, तरुणांनी दिला मेंढपाळाला मदतीचा हात

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : फुलंब्री तालुक्यात सतत मुसळधार चालू असलेल्या पावसामुळे निमखेडा येथील गिरिजा नदीवरील पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना येण्या-जाण्या करिता खूप कसरत करावी लागत आहे. पुलावरून जात असताना मेंढपाळांचे तीन मेंढरे पाण्यामध्ये वाहून जाताना दिसल्याने निमखेडा गावातील तरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन या मेंढपाळ व्यावसायिकाला मदत केली. त्यामुळे या तरुणांचे मेंढपाळ व्यावसायिकांनी आभार मानले.

या तरुणांनी वाहून जाणारे मेंढरे वाचवून सुखरूप मेंढपाळ व्यावसायिकाला सोपवली. या मेंढपाळ व्यावसायिकाकडे सुमारे दोन हजार मेंढरे होती. निमखेडा ते जीवरग टाकळी या दोन्ही गावाच्या मधोमध गिरीजा नदी असल्याने नदीला पुराचे मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्याचबरोबर या दोन्ही गावाला जोडण्यासाठी गिरीजा नदीमध्ये पूल उभारण्यात आलेला आहे. मात्र या पुलाची उंची कमी असल्यामुळे नदीला पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर पुलावरून पाणी वाहू लागते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नदीला पाणी आल्यानंतर पुलावरून दुसऱ्या थडीला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

या पुलावरून शनिवारी (ता.२६) मेंढपाळ व्यावसायिक मेंढ्या घेऊन पुलावर आल्यानंतर या पाण्याच्या प्रवाहातून जाण्यासाठी मेंढ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. हे लक्षात आल्यानंतर येथील तरुणांनी पुलावर एकमेकांत अंतर ठेवून साखळी करून या मेंढपाळ व्यावसायिकांच्या मेंढ्या पुलाच्या दुसऱ्या थडीपर्यंत सोडण्यात मदत केली. यामध्ये गावातील आबासाहेब फुके, बालाजी भोसले, एकनाथ फुके, संजय जिवरग, राधाकृष्ण फुके, आकाश फुके, कृष्णा तुपे, रवी फुके , बाळू लुटे, शिवदत्ता वाघ, साईनाथ गायकवाड, वैभव फुके आदी तरुणांनी मेंढ्यांना पाण्याच्या बाहेर काढण्यासाठी मदत केली आहे.

टोमॅटो, शेवगा खातोय भाव !

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com