कचऱ्याप्रमाणे व्हेंटीलेटर जिल्ह्यात टाकू दिले, खासदार जलील असे का म्हणाले?

शेखलाल शेख
Monday, 7 September 2020

औरंगाबाद शहरात सद्यस्थितीत व्हेंटीलेटरसाठी रुग्ण, त्यांचे नातेवाईक एका हॉस्पीटलमधून दुसऱ्या हॉस्पीटलमध्ये फिरत आहे. ग्रामीण भागात वापरात नसलेले व्हेंटीलेटर त्वरीत परत घेऊन ते घाटी रुग्णालय किंवा महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड सेंटरला द्यावे. असे मुद्दे लोकप्रतिनिधींच्या बैठकीत उपस्थितीत केल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवार (ता.७) माध्यमांशी बोलतांना सांगितले.

औरंगाबाद : दिल्लीत बसलेल्या एका सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने पीएम केअर फंडातून आलेले व्हेंटीलेटर औरंगाबाद जिल्ह्यात पाठवुन दिले. ज्या ठिकाणी हातळणारी यंत्रणाच नाही अशा ठिकाणी हे व्हेंटीलेटर आज कचऱ्याप्रमाणे पडून आहे. यातील काही व्हेंटीलेटरचा वापर होत नाही. शहरात सद्यस्थितीत व्हेंटीलेटरसाठी रुग्ण, त्यांचे नातेवाईक एका हॉस्पीटलमधून दुसऱ्या हॉस्पीटलमध्ये फिरत आहे. ग्रामीण भागात वापरात नसलेले व्हेंटीलेटर त्वरीत परत घेऊन ते घाटी रुग्णालय किंवा महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड सेंटरला द्यावे. असे मुद्दे लोकप्रतिनिधींच्या बैठकीत उपस्थितीत केल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवार (ता.७) माध्यमांशी बोलतांना सांगितले.

डिसेंबर अखेरपर्यंत ६१३ ग्रामपंचायतींवर प्रशासक निभावणार सरपंचाची भूमिका!

खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, ऑक्सीजन बेड आणि व्हेंटीलेटरसाठी रुग्णांची फरफट सुरु आहे. त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहे. पीएम केअर फंडातून दिलेले व्हेंटीलर ग्रामीण भागात दिले. मात्र तेथे ते हातळणारी यंत्रणाच नाही. गंगापुर येथे दहा व्हेंटीलेटर देण्यात आले त्यातील ४ चालु आहे. दोन शहरातील एका खासगी हॉस्पीटलला देण्यात आले. कन्नडमध्ये १० व्हेंटीलेटर दिले हे सर्व वापरात नाही. वैजापुर मध्ये १९ व्हेंटीलेटर दिले त्यातील फक्त पाच चालु आहे. पाचोड मध्ये दहा व्हेंटीलेटर दिले होते.

त्यातील फक्त २ उपयोगात येत आहे. त्यामुळे जे व्हेंटीलेटर यंत्रणेअभावी वापरात नाही ते परत घेऊन घाटीच्या सुपरस्पेशालीटी विभागाला द्यावे तेथे जर जागा नसेल तर ते महापालिकेने उभारलेल्या मेल्ट्रॉन कोविड सेंटर मध्ये देण्यात यावे. तसेच जे व्हेंटीलेटर खासजी रुग्णालयांना देण्यात आलेले आहे ते रुग्णांकडून पैसे वसुल करत नाही ना हे तपासले पाहिजे.

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी, जायकवाडी धरण ९८ टक्के भरले

शहरात आज व्हेंटीलेटरची खुप आवश्‍यकता असतांना दुसरीकडे जिल्ह्यात यंत्रणेअभावी व्हेंटीलेटर बंद आहे. हे वापरात नसलेले व्हेंटीलेटर दोन दिवसात परत आणून असे आश्‍वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. तसेच इतर जिल्ह्यात रुग्ण औरंगाबादेत येत असल्याने येथील यंत्रणेवर ताण पडत आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुविधा निर्माण व्हावी. प्रत्येक तालुक्यात सुद्धा कोविड सेंटर असावे जेथील रुग्ण आहे त्यांचे उपचार तिथेच व्हायला हवे म्हणजे यंत्रणेवर ताण पडणार नाही.

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unuse Ventilators Put Like Garbage, Said Imtiaz Jaleel