
भरधाव इनोव्हा कारच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील देवगाव फाटा (ता.पैठण) येथे रविवारी (ता.१३) रोजी सात वाजेच्या सुमारास घडली.
कारच्या धडकेत महिला शेतकरी गंभीर जखमी, चालक फरार
आडुळ (जि.औरंगाबाद) : भरधाव इनोव्हा कारच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील देवगाव फाटा (ता.पैठण) येथे रविवारी (ता.१३) रोजी सात वाजेच्या सुमारास घडली. पारूबाई मोहन पवार (वय ५०, राहणार थापटीतांडा, ता.पैठण) ही शेतकरी महिला शेतातील दिवसभराची कामे आटोपून घरी येत असताना औरंगाबादकडुन भरधाव वेगाने येणारी इनोव्हा कारने जोराची धडक दिली.
यात या महिलेच्या डोक्याला जबर मार लागला असुन त्यांना आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता येथील तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एक ही उपस्थित नव्हते. त्यामुळे जखमी महिलेला येथील १०२ रुग्णवाहिकेचे चालक विजय भालेराव यांनी औरंगाबाद येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले. अपघात होताच इनोव्हा कारचा चालक कारसह पाचोडच्या दिशेने फरार झाला.
शेतकरी आत्महत्याबाबत उदासीनता का? बँकांकडून २५ टक्केही कर्जपुरवठा नाही
अपघात होताच किरण काळे, विजय गायकवाड यांनी मदतकार्य केले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच आडुळ बिट जमादार सुधीर ओव्हाळ व फिरोज बरडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला उपचारासाठी आडुळ येथे पाठविले.
गुटखा विक्री करणारा ठोक विक्रेता अटकेत
औरंगाबाद : बेकयदेशीरपणे गुटखा विक्री करणाऱ्या राजाबाजार येथील एका व्यापाऱ्याला पोलिसांनी छापा मारुन अटक केली. त्याच्या ताब्यातून एक लाख ६०४ रुपयांचा गुटखा, सुंगधीत तंबाखू जप्त करण्यात आली. प्रणय जवाहरलाल जैन (रा. प्रगती कॉम्पलेक्स, सातारा परिसर) असे संशयिताचे नाव आहे. त्याला मंगळवार पर्यंत (ता. १५) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. तारे यांनी रविवारी (ता. तेरा) दिले. सिटीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक संजय मोहन नंद यांनी तक्रार दिली. १२ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता उपनिरीक्षक श्री. पाथरकर यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी अन्न औषध प्रशासनाच्या मदतीने रात्री दहा वाजता कुंदन ट्रेडींग कंपनीवर छापा मारला. त्यावेळी कारवाईत तब्बल एक लाख ६०४ रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला होता. न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी बाजू मांडली.
संपादन - गणेश पिटेकर
Web Title: Woman Farmer Injured Car Accident Aurangabad News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..