महिलेने दिला तिळ्यांना जन्म, आईसह तिन्ही बाळ सुखरुप

सचिन चोबे
Wednesday, 16 September 2020

सिल्लोड येथे पंचवीस वर्षीय महिलेने तिळ्यांना जन्म दिला. सोमवारी (ता.१४) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास महिलेची प्रसुती झाली असून, बाळ व बाळंतीण सुखरूप आहे.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : सिल्लोड येथे पंचवीस वर्षीय महिलेने तिळ्यांना जन्म दिला. सोमवारी (ता.१४) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास महिलेची प्रसुती झाली असून, बाळ व बाळंतीण सुखरूप आहे. शहरातील वरद हॉस्पिटल येथे प्रसुतीतज्ज्ञ डॉ.काशिनाथ कोष्टी यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने महिलेची यशस्वीरित्या प्रसुती केली. कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू असतांना दवाखान्याची पायरी चढणे म्हणजे मनात धास्ती उभी राहत आहे.

पिंपळगाव घाट (ता.सिल्लोड) येथील पुष्पा आण्णा फरकाडे यांना प्रसुती वेदना सुरू झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.सोनोग्राफी केल्यानंतर तीन कमी वजनांची बाळे असल्यामुळे धोका पत्कारुन डॉ.कोष्टी यांनी प्रसुती करण्याचे ठरविले. महिलेचे हिमोग्लोबीन केवळ ८.६ टक्के असल्याने रक्तस्त्राव झाल्यास सिल्लोडसारख्या ठिकाणी रक्त मिळविणे देखील जिकिरीचे. परंतू अशा परिस्थितीमध्ये सोमवारी संध्याकाळी सहा वाजून ५४ मिनिटांनी महिलेची नॉर्मल प्रसुती होऊन तीने मुलीस जन्म दिला.

छत्रपती उदयनराजेंनीच नेतृत्व करावे, मराठा आरक्षणासाठी विनायक मेटेंनी केले आवाहन

त्यानंतर दुसरे बाळ आडवे झाल्याने डॉक्टरांसमोर सिझर केल्याशिवाय पर्याय उरला नाही. पंचवीस मिनिटांच्या आत त्यांनी भूलतज्ज्ञास पाचारण करित महिलेस भुल दिली. त्यानंतर महिलेने सात वाजून २३ मिनिटांनी मुलीस व ७ वाजून २४ मिनिटांनी मुलास जन्म दिला. याअगोदर महिलेस पहिली मुलगी असून, सोमवारी महिलेने तिळ्यांना जन्म दिला. पहिल्या बाळाचे वजन १ किलो, दुसऱ्याचे १ किलो ४०० ग्रॅम व तिसऱ्या बाळाचे वजन १ किलो १०० ग्रॅम एवढे आहे. तीनही मुलांना शहरातील समृद्धी बाल रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिघा बाळांची प्रकृती उत्तम आहे. सर्वसामान्यांचा डॉक्टर म्हणून ओळख असलेले प्रसुतीतज्ज्ञ डॉ.काशिनाथ कोष्टी कायम रूग्णांना आपुलकीची वागणूक देतात.

मराठवाड्यातील विद्यार्थ्‍यांचे होतेय ‘सैन्य’ क्षेत्राकडे दुर्लक्ष, जाणून घ्या...

आहे त्या परिस्थितीमध्ये कुठलीही आडकाठी न ठेवता रूग्णांना उपचार देण्यावर त्यांचा कायम भर असतो. सोमवारी देखिल अवघड परिस्थिती बघता त्यांनी धोका पत्करून महिलेची प्रसुती केली. या कामी त्यांना भुलतज्ज्ञ डॉ.नदीम खान, बालरोगतज्ञ डॉ.विकास गोठवाल, डॉ.दिव्यानी पाटणी, परिचारिका सरला मालोदे, गीतांजली, कल्पना दांडगे, लक्ष्मी थोरात, औषधी व्यावसायिक नितीन नारखेडे, विशाल दांडगे यांचे सहकार्य मिळाले.

 

 

महिलेची प्रसुती करणे अवघड होते. हिमोग्लोबीन कमी असल्यामुळे रक्तस्त्राव झाल्यास रक्ताची तजवीज करणे अवघड जाते. यामुळे रूग्णाची प्रकृती खालावत जाते. प्रसुतीसाठी आलेल्या महिलेचे पुर्ण दिवस भरले होते. प्रसुती नॉर्मल करण्याचा निर्णय घेतला पहिले बाळ नॉर्मल प्रसुत करण्यात यश मिळाले. परंतू त्यानंतर दुसरे बाळ आडवे झाल्याने सिझर करावे लागले. पंचवीस मिनिटांत निर्णय घेऊन सहकाऱ्यांनी मदत केल्यामुळे महिलेची प्रसुती करण्यात यशस्वी झालो. तीनही बाळांची प्रकृती ठिक असून, वजन कमी असल्यामुळे त्यांना बालरोगतज्ज्ञांच्या निगराणीत ठेवले आहे.
डॉ.काशिनाथ कोष्टी, प्रसुतीतज्ज्ञ, वरद हॉस्पिटल, सिल्लोड

 

Woman Gave Birth Trio Aurangabad News

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Gave Birth Trio Aurangabad News