World Health Day 2021: 'सेवाभाव उरला नाही, आपला प्रवास उलट्या दिशेने'

World health day 2021
World health day 2021

औरंगाबाद: ‘‘वीज नाही म्हणुन एक वृद्ध नालीत पडतो व त्याचे हाड मोडते. त्याला नेण्यासाठी आपत्कालीन रुग्णवाहीका (१०८) खेड्यापर्यंत पोचत नाही. ग्रामीण भागात एखाद्या व्यक्तीला साप चावल्यास शहरात उपचारासाठी येईपर्यंत तिचा मृत्यू होतो. ही आपली शोकांतिका आहे. हीच स्थिती आरोग्याची आहे. आज खेड्यात डॉक्टर राहत नाहीत ना सुविधा आहेत. आपला प्रवास उलट्या दिशेने सुरु असून डॉक्टरांत सेवाभाव उरला नाही. असे निरीक्षण सेवाव्रती डॉ. अशोक बेलखोडे यांनी नोंदविले.

मराठवाड्यातील आरोग्याच्या समस्यांवर त्यांनी बोट ठेवले. थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेने मराठवाड्यातील आदिवासी बहुल तालुका असलेल्या किनवट हे त्यांनी कार्यक्षेत्र निवडले. त्यांचे अचाट वैद्यकीय कार्य असून ते आजही समर्पित भावनेने कार्य करीत आहेत. जागतिक आरोग्य दिनानिमित्त मराठवाड्याचे आरोग्य व वैद्यकीय क्षेत्र त्यांच्या नजरेतून.’’ ॉ

‘‘वैद्यकीय सेवा सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. जोपर्यंत सरकार दिशादर्शक होत नाही. प्रशासन कर्तव्यतत्पर आणि जनता सुबुद्ध, देशाभिमानी होत नाही तोपर्यंत असेच चालणार. आरोग्य व्यवस्थेबाबत सांगायचे झाल्यास ७५ टक्के व्यवस्था खासगी क्षेत्राच्या हाती व उर्वरित २५ टक्के शासनाच्या अधिपत्याखाली आहे. तिचीही अवस्था किती वरवर व वाईट आहे ते कोरोनाने दाखवून दिले आहे. सरकारी आरोग्य यंत्रणा अजून शक्तीशाली बनविणे आवश्‍यक आहे.

कोरोनामध्ये सरकारी यंत्रणाच कामी आली. पण सरकारच खासगी क्षेत्रातील लोकांना बळ देत आहे. प्रत्येक गोष्टींचे खासगीकरण करीत आहेत. आपण उलट्या दिशेने जात आहोत. कोविडने जात, धर्म, पंथ व देवालयाच्या पलिककडे माणुसकी आहे हे आपल्याला शिकविले. पर्यावरणाचा ऱ्हास करु नये हे शिकविले. पण आपण विकासाच्या नावाखाली विनाशाकडे जात आहोत याला जनता जबाबदार आहे.

डॉक्टरांमध्ये सेवाभाव कुठुन येणार? 
थोर समाजसेवी बाबा आमटे, प्रकाश आमटे, पन्नालाल सुराणा, यदुनाथ थत्ते या दिशादर्शक लोकांमुळे आम्ही घडलो. आताच्या पीढीमागे असे दिशादर्शक कोण लोक आहेत? आताची पिढी मोठा पैसा खर्च करून वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्यांना पैसे काढायचे आहेत. खासगी महाविद्यालये वाढत आहेत. त्यांचे शुल्कही वाढत आहे. पदव्युत्तर शिक्षणाचा खर्च खासगी महाविद्यालयात कोट्यावधींमध्ये गेला. महाविद्यालयात सेवाभावच शिकविला जात नाही. पदवी शिक्षणानंतर पदव्युत्तर शिक्षणाचे वेध लागलेले असतात. वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांना डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. हिम्मतराव बावस्कर, शशिकांत अहंकारी यांचे मार्गदर्शन देण्याची गरज आहे. 

आरोग्यमंत्री डॉक्टर का नाही? 
राज्याचे आरोग्य मंत्री अभियंता आहेत. एक चांगला डॉक्टर राज्याचा आरोग्यमंत्री का राहू शकत नाही. एका डॉक्टरने आरोग्याचा कारभार चालविणे व अभियंत्याने कारभार चालविणे यात मोठी तफावत आहे. ही आपल्या राज्याची शोकांतिका आहे. डॉ. अभय बंग सारखी व्यक्ती डॉक्टर्स का मंत्री बनु शकत नाहीत. 

कोरोना नियमाचे उल्लघंन करणारे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर करावाई करा,...

डॉ. बेलखोडे यांच्या मते 
- यंत्रणा ढिसाळ, काम करण्याची इच्छा असलेले लोक फक्त २५ टक्के आहेत. 
- आरोग्य खात्यात रिक्त सतरा हजार जागा आहेत त्या भरलेल्या नाहीत. 
- मराठावाड्यासाठी ‘फिजिओथेरपी’ महाविद्यालय २००४ ला मान्यता मिळाली पण सुरु झाले नाही. 
- आता सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना ‘फिजिओथेरपी’ विभाग जोडला तेव्हा मराठवाड्याला महाविद्यालय मिळाले. 
- इमारत बांधली जागा भरतीसाठी बजेट नाही! असे का? 
- नांदेडला नर्सिंग महाविद्यालय सुरु झाले पण आदीवासी भागात नर्सिंग स्कुल सुरु करा अशी मागणी होती ती मान्य नाही. 
- आदीवासी मुली या माध्यमातून प्रवाहात आल्या असत्या पण सरकार गंभीर नाही. 
- सर्व आरोग्याचे प्रश्‍न वैधानिक विकास मंडळात असताना लावून धरले उपयोग झाला नाही. 
- रुग्णवाहीका घेऊन सतरा वर्षे झाली, अजून बदलल्या नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने गळकी आहेत.

डॉ. अशोक बेलखोडे यांचे कार्य 
सेवाव्रती डॉक्टर म्हणून डॉ. अशोक बेलखोडे परिचत आहेत. थोर समाजसेवी बाबा आमटे यांच्या प्रेरणेने मराठवाड्यातील आदिवासी तालुका असलेल्या किनवट तालुक्यातील ३९२ पेक्षा अधिक खेड्यांतील दीड लाखांहून अधिक रुग्णांना त्यांनी सेवा दिली. त्यांनी याच परिसरात आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक व विज्ञानाच्या जोडीने बहुआयामी प्रयोगशाळा उभारली. सत्तर हजारांहून अधिक शस्त्रक्रिया त्यांनी केल्या. फक्त ७५ रुपये मानधनावर बिनटाक्याची कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया ते करीत. बिनटाक्याच्या ३५ हजार कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com