
प्रत्यारोपणानंतर डॉ. मोहम्मद हसीब जगताहेत सामान्य जीवन
औरंगावाद : शहरात दोन वर्षांपूर्वी अवयवदानाच्या चळवळीने जोर धरला होता. याच चळवळीतून गरजूंना अवयव मिळाले. अवयवदानात किडनीमुळे जीवदान मिळालेले डॉ. मोहम्मद हसीब मोहम्मद रशीद शेख हे सामान्य जीवन जगत आहेत. अवयव दान केलेच पाहिजे, मृत्यूनंतर नष्ट होणारे अवयव कुणाच्यातरी आयुष्यात रंग भरतात, आयुष्याला फुलवतात. पुरेशा जनजागृती अभावाने थंडावलेल्या अवयवदानाच्या चळवळीला पुन्हा गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या तेवीस वर्षांपासून मला मधुमेह व रक्तदाब आहे. २००६ मध्ये शरीरातील क्रिएटिन ५.२ वर आले. त्यासाठी काही औषधे घेतली त्यानंतर ते १.२ पर्यंत सामान्य झाले. मात्र हळूहळू क्रिएटिन वाढत जात होते. क्रिएटिन वाढण्याची लक्षणे क्रोनिक किडनी फेल्युअर असल्याचे जाणीव करून देत होते. २००६ ते २०१० पर्यंत काही औषध घेऊन भागले, पण २०१० मध्ये क्रिएटिन तब्बल ३२ झाले. घरातील वातावरण चिंतेत रुपांतरीत झाले.
राज ठाकरे औरंगाबादेत आले, पण कोरोनाने केला मुड आँफ
अखेर ॲडमिट करावे लागले. डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी डायलेसिस सुरू केले. घरात कुणाचीही किडनी मॅच होत नव्हती. त्यामुळेच सर्व कुटूंब अशरश: हादरुन गेले. जवळपास एक महिना ॲडमिट राहिलो. त्यानंतर २० एप्रिल २०१० रोजी डॉ. सचिन सोनी यांनी उपचार सुरू केले. २०१६ पर्यंत उपचार सुरू होते. फेब्रुवारी २०१६ मध्ये शहरात अवयवदानाच्या चळवळीतून मला किडनी मिळाली.
विभागीय रोपन समन्वय समिती (झेडटीसीसी) मुळे मला किडनी मिळाली. किडनीच्या निमित्ताने जिवदान मिळाले. त्यामुळेच सर्वात पहिले मी देवाचे आभार मानतो. प्रत्यारोपण झाल्याने आज मी सामान्य जीवन जगत आहे. अवयवदानाची चळवळ अत्यंत महत्त्वाची आहे.
‘‘डॉ. सचिन सोनी, गणेश बरनेला, डॉ. ओसवाल, डॉ. सुधीर कुलकर्णी, डायलिसिस टेक्निशियन शेख शहानवाज, गायकवाड तसेच माझे कुटुंबीय आणि मित्र परिवार ज्या सर्वांनी माझ्या कठीण प्रसंगात साथ दिली त्या सर्वांचे मी आभार मानतो. एकदा किडनी डिसिज झाला म्हणजे घाबरायचे नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करा आणि धीराने या आजाराला सामोरे जा. विश्वास ठेवा नक्की चांगलं होईल.’’
-डॉ. मोहम्मद हसीब मो. रशीद शेख