यंदा विद्यार्थ्यांचा दीपोत्सव सूनासूना, कोरोनामुळे शाळा बंदचा परिणाम

संदीप लांडगे
Sunday, 8 November 2020

दरवर्षी दिवाळीच्या सुटी आगोदर शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात येतो. विद्यार्थी आपल्या हाताने आपल्या आवडीचा आकशदिवा, पणती, घराला बांधायचे तोरण या सर्व वस्तू बनवितात.

औरंगाबाद : दरवर्षी दिवाळीच्या सुटी आगोदर शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात येतो. विद्यार्थी आपल्या हाताने आपल्या आवडीचा आकशदिवा, पणती, घराला बांधायचे तोरण या सर्व वस्तू बनवितात. मात्र, यंदा कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळेतल्या दीपोत्सवाची खूप आठवणी येत असल्याची भावना विद्यार्थ्यांसह शिक्षक व्यक्त करित आहेत. देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मार्च महिन्यात परीक्षा न घेताच शाळांना सुट्या देण्यात आल्या होत्या. शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्रही संपले आहे. परंतु कोरोनामुळे शाळा अद्यापही बंद आहे.

हवेच्या गुणवत्तेसाठी येणार १६ कोटी; पण महापालिकाच अनभिज्ञ! 

कोरोनामुळे सर्व सण-उत्सव यंदा फिके पडले आहेत. परंतु दीपोत्सव हा एकमेव उत्सव असा आहे. ज्याची लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण वाट पहता असतात. शाळांमध्ये दिवाळीच्या सुट्या सुरु होण्यापूर्वी शाळेतही पूर्व दिवाळीचा उत्साह साजरा केला जातो. या निमित्त पर्यवरण रक्षणासाठी विद्यार्थी फटाके न वाजवता आपल्या हातांनी तयार केलेले रंगबिरंगी दिवे, आकाशदिवे, किल्ले शाळेत बनवितात. शाळेत बनवलेले दिवे आणि आकाशदिवे आपल्या घरातील दीपोत्सवात वापरण्याचा संकल्प विद्यार्थी करतात. परंतु यंदा कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. शाळेतल्या या प्रकल्पांची आठवण होत असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

 

दरवर्षी शाळेत सहामाही परीक्षा घेऊन दीपावली निमित्त दीपोत्सवाचा उपक्रम राबवला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे शाळांच बंद असल्यामुळे मुलं घरीच आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षकांनी काही उपक्रम सांगितले आहेत. पण प्रत्यक्ष आणि ऑनलाईनच्या माध्यमातून उपक्रम घेणे यात खूप मोठा फरक आहे.
- राजीव शिंदे, विद्यार्थी
 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Year No Deepotsava Celebration With Students Aurangabad News