esakal | तो म्हणाला तुला कोरोना झाला अन् सुरु झाली मारामारी 
sakal

बोलून बातमी शोधा

तो म्हणाला तुला कोरोना झाला अन् सुरु झाली मारामारी 

सोनवाडी तालुका पैठण येथील समीर अन्वर सय्यद हा पुणे जिल्ह्यात एका कंपनीत नोकरी करतो. तो दहा मार्च रोजी गावाकडे आला होता. समीर सय्यद सोनवाडी बु. येथील एका दुकानात किराणा सामान घेण्यासाठी गेला. याचवेळी दुकानांच्या बाहेर एक जण उभा होता त्या तरुणाने समीरला विचारले की तुला कोरोना झाला आहे. आमच्या गावात का आला आहे. असं मारहाण करण्यास सुरुवात केली आहे. 

तो म्हणाला तुला कोरोना झाला अन् सुरु झाली मारामारी 

sakal_logo
By
हबीब पठाण

पाचोड (जि. औरंगाबाद): एक तरुण किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेल्यावर दुकानाबाहेर उभा असलेल्या एका जणाने तुला कोरोना झाला असं म्हणताच दोघांना मध्ये चांगलीच हाणामारी झाली. यामध्ये एका कुटुंबातील तिघे लाठ्या-काठ्यांमुळे जखमी झाले. सोनवाडी (ता. पैठण) येथे ही घटना घडली. 

देश, राज्य आणि ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाची चांगलीच धास्ती आहे. संचारबंदी जाहिर झाल्यापासून सर्वत्र जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. सोनवाडी तालुका पैठण येथील समीर अन्वर सय्यद हा पुणे जिल्ह्यात एका कंपनीत नोकरी करतो. तो दहा मार्च रोजी गावाकडे आला होता. समीर सय्यद सोनवाडी बु. येथील एका दुकानात किराणा सामान घेण्यासाठी गेला. 

हेही वाचा- कोरोनाच्या धास्तीने शेतात गेले पण मृत्यूने गाठले...

याचवेळी दुकानांच्या बाहेर एक जण उभा होता त्या तरुणाने समीरला विचारले की तुला कोरोना झाला आहे. आमच्या गावात का आला आहे. असं मारहाण करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी समीर यांनी आपल्या भावाला व वडिलांना फोन करून सांगितले. समीरचे आई वडील भाऊ व बहीण हे किराणा दुकानाजवळ आले. यांना पण तीन ते चार जणांनी बेदम मारहाण केली. 

या मारहाणीत समीर सय्यद, अन्वर सय्यद, शबनुर अफरोज शेख हे तीन जण गंभीर जखमी झाले. तर दुसऱ्या गटातील दोन जण पण जखमी झाले. यावेळी पोलिस पाटील सय्यद महेबूब सय्यद दादा यांनी तातडीने पाचोड पोलिस ठाण्यात माहिती दिली. जखमीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीपान काळे यांनी उपचार केले. पाचोड पोलिसांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात येऊन जखमी चे जवाब नोंदविले. 

go to top